प्रतिनिधी : मुंबई
सोलापूर येथे कार्यरत डॉ. सुहास माने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चल अचल संपती गोळा केली आहे. त्यांना येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांची साथ आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात प्रत्येक कामासाठी टक्केवारी घेतली जाते. दुसरीकडे पैशाच्या जोरावर गुंडप्रवृत्तीची लोक सांभाळून अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो. कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे शारीरिक शोषण केले जाते. त्यामुळे महिलांचे शोषण अन कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करा, त्यांची खाते निहाय व विभागीय चौकशी करा, अशी गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार आंबेडकरी जनता दल महाराष्ट्र राज्य चे महासचिव प्रदिप महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
लेखी तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडून निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून विविध कामांसाठी टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी यापूर्वी आरोग्य उपसंचालक यांचेकडे बऱ्याच वेळा डॉ. सुहास माने यांच्या लेखी तथा शाब्दीक तक्रारी केल्या आहेत. परंतु याचा कुठलाही परिणाम डॉ. सुहास माने यांच्यावर झालेला दिसून येत नाही. डॉ. सुहास माने हे महिला पिसाट आहेत. त्यांच्याकडून महिला कर्मचारी यांचे शारिरीक शोषण केल्याची गोपनिय माहिती आहे. तक्रारी दाखल केल्यास जिल्हा रुग्णालयातील गरीब कंत्राटी कर्मचारी यांना दमदाटी करुन कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे गरीब कंत्राटी महिलांच्या जिवाला धोका आहे.
तरी वरील सर्व गंभीर बाबींचा विचार करुन डॉ. सुहास माने यांच्या संपत्तीची चौकशी करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करा, महिलांचे रक्षण करा. तसेच या विविध मागण्यासंदर्भात शासनाचे व आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे लेखी तक्रारीत तक्रारदार आंबेडकरी जनता दल महाराष्ट्र राज्य चे महासचिव प्रदिप महाजन यांनी म्हटले आहे.
महिलांबाबतची गोपनीय माहिती मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे देणार…
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने हे महिलांच्या बाबतीत पूर्वीपासुनच वादग्रस्त राहिले आहेत. सध्याही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे संबंधीत सर्व महिलांची नावे तक्रारीत उघड करणे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे महिलांबाबतची गोपनीय माहिती, पिडीत महिलांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक आणि पद ही सर्व माहिती मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे देणार आहे, अशी प्रतिक्रीया आंबेडकरी जनता दल महाराष्ट्र राज्य चे महासचिव प्रदिप महाजन यांनी दिली. तसेच गंभीर तक्रारींबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना त्यांची प्रतिक्रीया विचारली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
Pradip Mahajan यांची लेखी तक्रार
आरोग्य सेवा पुणे उपसंचालक पदी डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती