सोलापूर : प्रतिनिधी
प्रत्येकाने किमान एक औषधी वनस्पती झाडाची लागवड शेतात किंवा आपल्या अंगणात करावी. जुन्या गोष्टीचे महत्त्व न विसरता त्या आत्मसात करणे गरजेचे आहे. आपण सध्या निसर्गापासून दूर जात आहोत, परंतु निसर्गपासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा. निसर्ग आपणास भरभरून देईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय वाळा रूजू
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करमाळा तालुक्यातील जिंती येथील आयुर्वेदिक दवाखान्यात शुक्रवारी, 22 मार्च 2024 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वरवटकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा वित्तीय अनियमिततेत बिलिंग सेक्शन क्लार्कला उपसंचालकांकडून अभय ?
आयुष ग्राम जिंती हा भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा उपक्रम आहे. गेल्या 3 वर्षांपासून जिंती व पंचक्रोशीतील नागरिकांना, रुग्णांना आयुर्वेद व योग चा फायदा होत आहे.
स्तनाचा कर्करोग या आजाराचे प्रमाण महिला वर्गांमध्ये जास्त असून महिलांनी या आजाराविषयी कुठलीही शंका अथवा भीती न बाळगता निसंकोचपणे तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, असेही आवाहन यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी उपस्थित महिला वर्गांसाठी केले. यावेळी आयुषग्राम कॅलेंडरचे व योग पुस्तिकेचे अनावरण सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच करमाळा तालुक्यातील 50 अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्याची सेवा पुरवणेकामी नुकतीच मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना करण्यात आली आहे. त्या फिरत्या वाहनाची व पथकाची पाहणी यावेळी सीईओ आव्हाळे यांनी केली.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले म्हणाले, उपलब्ध असलेल्या वनौषधी, आहार, व्यायाम, योग, प्राणायाम या माध्यमातून आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे.
यावेळी जवळपास 700 रुग्णांनी आयुष शिबिराचा लाभ घेतला. तसेच 11 तालुक्यातील 22 आरोग्यसेविका यांना प्रोजेक्ट निदान अंतर्गत स्तनाचा कर्करोग तपासणीसाठीच्या थर्मल स्कॅनिंग मशीनचे प्रशिक्षण स्त्रीरोग तज्ञ मार्फत देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी केले. आभार जिंती आयुष ग्रामचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे यांनी मानले.
हे ही वाचा उपसंचालकांकडून सिव्हील सर्जनसह 7 जणांना हजर राहण्याच्या सूचना