Eknath Shinde | मराठा आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जालना येथील मनोज जरांगे-पाटील उपोषण करत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाच वाजता मनोज जरांगे-पाटील यांना भेटणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना “आपण बोलून मोकळं व्हायचं ना…” म्हणत असलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठीचा आजचा दौरा रद्द केला आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सर्वपक्षीय मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर मराठा आरक्षणावर आयोजित पत्रकार परिषदेला माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे येताच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत “आपण बोलून मोकळं व्हायचं ना…” म्हणतात. परंतु माईक सुरू असल्याने त्यांचे बोलने व व्हिडीओ प्रसिध्द झाला आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द …
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीनंतर सकारात्मक चर्चा केल्यानंतर एक महिन्यासाठी थांबवणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री शिंदे हे देखील आज जरांगे-पाटील यांची भेट घेणार होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी 4.15 वाजता शासकीय विमानाने औरंगाबाद विमानतळावर येणार होते. त्यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून हेलिकॉप्टरने जालन्यातील अंकुशराव टोपे साखर कारखान्याकडे जाणार होते. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मुख्यमंत्र्यांचा सदरचा दौरा रद्द झाल्याच्या चर्चा होत आहेत.