सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार आणि महापालिकेच्या नियम-अटीनुसार मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी राज्यभरात अर्हता प्राप्त तज्ञ डॉक्टर-अधिकारी उपलब्ध आहेत. असे असताना उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकर यांनी अर्हता नसलेल्या डॉ. राखी सुहास माने यांना चुकीच्या पध्दतीने नियुक्ती आदेश दिला आहे. परिणामी उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांच्या चुकीच्या आदेशामुळे येथील प्रहार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे फोटो गळ्यात लटकवत निषेध आंदोलन केले आहे, ज्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांच्या चुकीच्या आदेशामुळेच प्रहार संघटना आक्रमक झाली असून त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची तिरडी यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामळे उप सचिव जेवळीकर हे आतातरी चुकीच्या पध्दतीने केलेली सदरची प्रतिनियुक्ती रद्द करणार आहेत का ? याची चर्चा नगरविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागात सुरू आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार आणि महापालिकेच्या सेवा भरतींच्या नियम-अटीनुसार मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची जन औषध वैद्यक शास्त्रातील MBBS, DPH अथवा MD PSM पदवी असणे आवश्यक आहे. मात्र सध्या आवश्यक अर्हता नसलेल्या कान, नाक, घसा तज्ञ डॉ. राखी सुहास माने यांना चुकीच्या पध्दतीने 3 वर्षांसाठी प्रतिनियुक्ती दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात सदरच्या पदासाठी आवश्यक अर्हता आणि अनुभव असलेले हजारो डॉक्टर आहेत. मात्र उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे-घेणे नाही, शासनाच्या शासन निर्णयातील नियम-अटींचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचे नियम-अटी वापरून सदरच्या पदासाठी अर्हता नसलेल्या डॉ. राखी सुहास माने यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. ज्यावेळेस महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी अर्हता आणि अनुभवी अधिकारी उपलब्ध नसतील, त्यावेळेस अर्हता आणि अनुभव नसलेल्यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. परंतु उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांना शासनाच्या नियम-अटी मान्य नाहीत असे दिसून येते.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी सुहास माने
उप सचिव जेवळीकरांकडून शासनाच्या आणि महापालिकेच्या सेवा भरती नियमांची पायमल्ली
डॉ. राखी सुहास माने या कान, नाक, घसा तज्ञ म्हणजेच ENT स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी गोरगरीब जनतेला क्लिनिकल वैद्यकीय सेवा देणे क्रमप्राप्त आहे. परंतु मुख्य आरोग्य अधिकारी पदाच्या हव्यासापोटी त्यांनी अर्हता नसताना विनंती अर्ज सादर केला. त्याहून कहर म्हणजे अर्हता नसताना आणि नियम-अटींना डावलून सार्वजनिक आरोग्य विभागातील कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची दिशाभुल करून सदरचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला आहे ? तसेच अर्हता आणि अनुभवी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतानाही अर्हता नसलेल्या डॉ. राखी सुहास माने यांना प्रतिनियुक्ती देऊन उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांनी देखील शासनाच्या आणि महापालिकेच्या सेवा भरती नियमांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे उप सचिव जेवळीकर हे सदरची प्रतिनियुक्ती केंव्हा रद्द करणार आहेत ? असा प्रश्न नगर विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागातून उपस्थित केला जात आहे.
अन्यथा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांची तिरडी यात्रा
उप सचिव अनिरूध्द जेवळीकरांनी सदरची चुकीच्या पध्दतीने केलेली प्रतिनियुक्ती निदर्शनास आणुन दिली आहे. त्यामुळे आतातरी सदरची प्रतिनियुक्ती रद्द करावी. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची तिरडी यात्रा काढणार असल्याचे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले.
हे ही वाचा आषाढी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या : सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा