• चिखली तालुक्यातील वळती येथे घडली होती घटना
• सहा वर्षानंतर लागला खटल्याचा निकाल
Wife’s Death : चिखली तालुक्यातील वळती येथे दारूड्या पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने ऊंदिर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली होती, याप्रकरणी चिखली येथील जिल्हा व सत्र न्यायालय (२) चे न्यायाधिश एस. बि. डिगे यांनी दारूड्या पतीस 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
चिखली तालुक्यातील वळती येथील आरोपी सुभाष ज्ञानदेव ऊगले हा पत्नी लक्ष्मी सुभाष ऊगले हिला रोजच दारू पिवून मानसिक त्रास देत अश्लील शिवीगाळ करत मारझोड करायचा, तर लक्ष्मीचा दिर ऊमेश ऊगले हाही दारू पिऊन मानसिक व शारिरीक त्रास देत असे. दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी पती सुभाष आणि दिर ऊमेश हे दोघे भाऊ दारू पिऊन घरी आले आणि दोन्ही मुली व मुलास मारझोड करू लागले. यावेळी लक्ष्मी आडवायला गेली असता तिला आरोपिने अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या सततच्या मारहाणीला व त्रासाला कंटाळलेल्या लक्ष्मीने घरातील ऊंदिर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला घरच्यांनी चिखली येथील खाजगी रूग्णालयात भरती केले, मात्र तिच्यावर ऊपचार सुरू असतांना दि २८ ऑगस्ट २०१८ रोजी तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करणार – आमदार धीरज लींगाडे
लक्ष्मीवर खाजगी रूग्णालयात ऊपचार सुरू असतांना पोलीसांनी लक्ष्मीचा मृत्यूपुर्वी जबानी घेतली असता, लक्ष्मीने जबानीत तिचा पती सुभाष ऊगले याच्या सततच्या त्रासाला कंटाळून घरातील ऊंदिर मारण्याचे औषध प्राशन केल्याचे सांगीतले. तर मृतक लक्ष्मीची आई सुनीता सवडतकर यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी पती आणि दिरा विरूध्द भांदवी कलम ३०६, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. चौकशी अंती चिखली पोलीसांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ऍड. आशिष केसाळे यांनी काम पाहिले. व कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई नंदाराम ईंगळे यांनी मदत केली.
लक्ष्मीच्या मृत्यूपुर्व जबानीने आरोपीला झाली शिक्षा
सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालयात (२) सुरू झाला, सरकारी पक्षाच्या वतीने ९ साक्षिदार तपासण्यात आले. मृतक लक्ष्मीची मृत्यूपुर्व जबानी आणि लक्ष्मीच्या आईची व शेजा-यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधिश एस बि डिगे यांनी आरोपी सुभाष ऊगले यास दोषी ठरवून कलम ३०६ अंतर्गत 5 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भांदवी कलम ४९८ अ, अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड असा निर्णय दिला.
हे ही वाचा एक कोटीची लाच, MIDC तील सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात