मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागात प्रधान सचिव, संचालक, औषध महामंडळाचे जनरल मॅनेजर या महत्त्वांच्या पदावरील अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणे आणि पुन्हा एखाद्याची नव्याने नियुक्ती करणे हा आता नेहमीचाच विषय. त्याच अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागातील अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुन्हा डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी बुधवारी (7 जुलै 2024 रोजी) काढला. मात्र या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले सहसंचालक डॉ. राधाकिशन पवारांचे स्वप्न भंगले आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
सार्वजनिक आरोग्य विभागात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर आरोग्य मंत्र्यांच्या नावे बीडच्या भुमीपुत्राकडून नेहमीच स्वतःचे नियम लादले गेले. एखाद्या जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकीत्सकांनाच नाहीतर उच्च पदस्थ अधिकारी असलेले प्रधान सचिव, संचालक, उपसंचालक यांनाही त्या-त्या पदावर नियुक्ती देताना आरोग्य मंत्र्यांच्या नावे “स्विट मेसेज” दिला जायचा. त्या-त्या पदाचा “आर्थिक प्रोटोकॉल” पाळल्याशिवाय पदे तर दिली गेली नसल्याची चर्चा राज्यभर आहे. उलट त्या-त्या पदावर बसल्यावर “दर महिन्याला” “प्रोटोकॉल”ची पुर्तता करण्याची ग्वाही वदवुन घेतली गेली. ज्यांना “प्रोटोकॉल”ची पुर्तता करणे जमले नाही, त्यांना गडचिरोलीची भिती, स्वेच्छानिवृत्ती, उचलबांगडी, निलंबनाचा सामना करावा लागल्याची चर्चा राज्यभर आरोग्य विभागात आहे. एकीकडे आरोग्य मंत्री आरोग्य यंत्रणा सुरळीत करण्याचे काम करत असताना दुसरीकडे बीडच्या भुमीपुत्राकडून आरोग्य यंत्रणा बिघडवण्याचे काम चोखपणे केले. उलट आरोग्य मंत्र्यांच्या आपण जवळचे असून हे सर्वकाही आरोग्य मंत्रीच करून घेत असल्याची अफवा आरोग्य विभागात पसरवली. दुसरीकडे आरोग्य मंत्र्यांच्या प्रामाणिक ओएसडी, पीए यांना घरचा रस्ता दाखवला. मात्र यामुळे नकळत आरोग्य मंत्री बदनाम झाले असून त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. परिणामी अधिवेशनात नवख्या आमदारांनीही आरोग्य मंत्र्यांना टार्गेट केल्याचे पहायला मिळाले.
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
डॉ. राधाकिशन पवारांचे स्वप्न भंगले
इतरांना पायउतार करून आणि जेष्ठांना डावलून उपसांचलक आणि सहसंचालक पदे मिळवल्यानंतर “भावी संचालक मीच” म्हणत डॉ. राधाकिशन पवारांनी संचालक पदाचे स्वप्न पाहिले. अनेक ठिकाणी बोलूनही दाखवले. परंतु आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जेष्ठतेनुसार जेष्ठ अधिकाऱ्यांकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी खुष आहेत. तर दुसरीकडे डॉ. राधाकिशन पवार यांचे सर्व विरोधक एकवटले आहेत. या सर्व विरोधकांकडून डॉ. राधाकिशन पवारांना आहे त्या सहसंचालक आणि उपसंचालक पदावरून पायउतार करून येथेही जेष्ठतेनुसार जेष्ठ अधिकाऱ्यांना बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे डॉ. पवारांच्या अडचणीत वाढ होणार असून 297 कोटींच्या औषध घोटाळ्याप्रमाणे पुन्हा त्यांचे निलंबन अटळ असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे. तर दुसरीकडे डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून संचालक-1 पद गेले तरी संचालक-2 साठी अद्यापही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
हे ही वाचा अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
महापालिकेत रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभाग मधील अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या नावे वसुली सुरू