सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांच्या तक्रारीवरून जि. प. आरोग्य विभाग सोलापूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी संबंधीत डॉ. नवले आणि मुजावर यांची अधिकार नसताना बेकायदेशीर प्रतिनियुक्ती, बेकायदेशीर कामकाज आदींबाबत उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सहा. संचालक डॉ. प्रतापराव सारणीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.
हे ही वाचा अखेर कनिष्ठ लिपीक मुजावर यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी तक्रारीत म्हटले होते की, डॉ. संतोष नवले यांनी उपसंचालकांच्या अधिकाराचा स्वतः गैरवापर केला. त्यांना प्रतिनियुक्तीचा अधिकार नसताना त्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्ती दिली होती. कनिष्ठ लिपीक मुजावर यांनी देखील उपसंचालकांचे अधिकार धुडकावून अधिकार नसणाऱ्या अधिकाऱ्याकडे प्रतिनियुक्तीसाठी विनंती अर्ज सादर केला. डॉ. संतोष नवलेंनी चुकीच्या व नियमबाह्य पध्दतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आणि मंजुर करून घेतला. पुढे “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”चे कामकाज मुजावर यांना देता येत नसतानाही ते दिले. याही गैरव्यवहाराची चौकशी करावी. जि. प. आरोग्य विभागात सक्षम अधिकारी-कर्मचारी असताना चुकीच्या पध्दतीने मुजावर यांची नियुक्ती आणि वरून चुकीचे कामकाज दिले गेले. त्यामुळे मुजावर यांच्याकडे प्रतिनियुक्ती दिल्यापासुनच्या कार्यकाळातील “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”ची अंमलबजावणी, नविन व नुतनीकरण परवाने, त्यांच्यासाठीचे चलन वेळेत आणि बँकेतच जमा केले आहे का ? त्यांच्या काळात ज्यांना दवाखान्यांचे नविन व नुतनीकरण परवाने दिले आहेत. त्या हॉस्पिटलची पुन्हा तपासणी करून वास्तवात असलेल्या खाटांची संख्या तपासावी. चलन वेळेत भरले आहे की स्वतः वापरले आहे, याचीही खातरजमा करावी, ज्यांना नविन आणि नुतनीकरण परवाने दिले आहेत. त्यांच्याकडून आर्थिक रक्कम उकळली असून संबंधीत हॉस्पिटलधारकांचे जबाब इन कॅमेरा घ्यावेत आणि चौकशीअंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना निलंबीत करून बडतर्फ करावे, असे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी चौकशी समितीसमोर सादर केले आहे. यावर चौकशी अधिकारी यांनी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक मशाक मुजावर यांना चौकशीची नोटीस बजावली आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
उपसंचालकांच्या नावे 3 लाख रूपये लाच स्विकारताना आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार ला अटक




