मुंबई : प्रतिनिधी
डॉ. राधाकिशन पवारांकडून वेळोवेळी पदाचा गैरवापर करून पदोन्नती, बदल्यांमध्ये टक्केवारी, जेष्ठांना डावलून पदस्थापना, औषध खरेदीत घोळ, 500 कोटींपेक्षा जास्त रूपयांचा भ्रष्टाचार आणि चल-अचल संपत्ती, बिड येथील व्हिलन, आरोग्य विभागातील स्त्रियांचे शोषण, अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, आषाढी वारीतील घोटाळे यासह इतर विविध गंभीर प्रकारची लेखी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. सदरची तक्रार भाजपा सेवा प्रकोष्ठ, जिल्हा संयोजक हर्षवर्धन खोब्रागडे यांनी दाखल केली आहे. ज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेकडून उच्चस्तरीय आणि खातेनिहाय चौकशी करून बडतर्फची मागणी केली आहे.
हे ही वाचा आशा वर्कर्स् प्रकरण; आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. राखी मानेंच्या उलट चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, आरोग्य विभागात नव्याने भरती झालेल्या स्त्री अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबतचे खाजगी चॅट रेकॉर्डची चौकशी करावी. ज्यातून प्रशासनाच्या लक्षात येईल की, डॉ. राधाकिशन पवार हे स्त्रियांचे कशा प्रकारे शोषण करतात. नको त्या सुखासाठी सदरच्या महिलेवर शरणागत व्हायची वेळ आणून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन ते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शासकीय विश्रामगृहे, खासगी हॉटेल… आदी गंभीर अरोप तक्रारीत केले गेले आहेत. तसेच डॉ. राधाकिशन पवार यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते आणि पुण्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागात 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावात अय्याशी निर्माण झाली आहे. तरी डॉ. पवार यांच्यासह त्यांचे नातेवाईक, निकटवर्तीय अधिकारी-कर्मचारी, पत्नी आदींच्या नावे जमा केलेली अवैध संपत्ती, आलेल्या सर्व तक्रारींची खातेनिहाय चौकशी करावी, SIT, केंद्रीय तपास यंत्रणेकडून उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी लेखी मागणी भाजपा सेवा प्रकोष्ठ, जिल्हा संयोजक हर्षवर्धन खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा
या तक्रारीबाबत डॉ. राधाकिशन पवार यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी “तक्रारीत तथ्य नसून सर्व प्रक्रीया नियमाप्रमाणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने केली आहे. तसेच संबंधीतांनी तक्रार परत घेतल्याचे म्हणत तक्रार मागे घेतल्याचे पत्र पाठवले आहे. परंतु तक्रार परत घेतल्याच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाचा सही-शिक्का नाही. त्यामुळे सदरची तक्रार बनावट पध्दतीने परत घेतली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सदरची लेखी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात सही-शिक्क्यानिशी दाखल केली आहे. त्यावर जो निर्णय होईल, तो चौकशी समिती घेणार आहे. त्यामुळे डॉ. राधाकिशन पवार यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचा ते स्वतःच निपटारा कोणत्या आधारावर करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.”
कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक पदी डॉ. प्रशांत वाडीकर यांची नियुक्ती