प्रतिनिधी : कोल्हापूर
अधिवेशन संपल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागातही बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरसाठी प्रामाणिक आणि वादग्रस्त नसणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या “होमटाऊन”मध्ये पसंती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक पदी डॉ. प्रशांत वाडीकर यांची नियुक्ती केली आहे. तसा आदेश सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी 23 जुलै 2025 रोजी जारी केला आहे.
हे ही वाचा बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई
सहायक संचालक (वैद्यकीय) या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. या पदावर असताना त्यांनी आषाढी वारीचे नेटके नियोजन, वारकऱ्यांची तत्पर आरोग्य सेवा, लाखो वारकऱ्यांना वेळेवर मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, प्रत्येक 5 किलोमीटरवर आपला दवाखाना, फिरते आरोग्यदुत, स्त्रियांसाठी हिरकणी कक्ष, ॲम्ब्युलन्स सेवा आदी उपक्रमातून भक्ती आणि आरोग्य सेवेचा संगम घडवून आणला होता. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सकपदी डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच डॉ. वाडीकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे.
हे ही वाचा अखेर कनिष्ठ लिपीक मुजावर यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द
डॉ. संतोष नवले आणि मुजावर यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा