सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारीपदी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभव नसताना डॉ. राखी सुहास माने यांची उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकर यांनी ऑर्डर काढली आहे. त्यांनी शासन आणि महापालिकेच्या सेवा भरती नियमांना हरताळ फासला आहे. याबाबत त्यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी “चुप्पी” साधत या प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे “सत्ताकारण”च्या प्रतिनिधीस सांगितले. तसेच त्यांना सध्या वस्तुस्थिती दाखवून दिल्यानंतरही ते डॉ. राखी सुहास माने यांची ऑर्डर रद्द करत नाहीत. यामागे उप सचिव अनिरूध्द जेवळीकरांकडून ऑर्डर रद्द न करण्यामागे आर्थिक देवाण-घेवाण केली आहे की कोणाचा दबाव आहे ? याची चर्चा नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सोलापूर महापालिकेत रंगली आहे.
हे ही वाचा अर्हता नसताना महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातारकरांकडून प्रयत्न
सोलापूर महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी सुहास माने यांची ऑर्डर महाराष्ट्र शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकर यांनी 7 जून 2024 रोजी काढली आहे. मात्र ऑर्डर काढताना उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकर यांनी महाराष्ट्र शासन आणि महापालिका सेवा भरती नियमास हरताळ फासला आहे. या पदासाठी आवश्यक “मान्यताप्राप्त विद्यापीठाची जन औषध वैद्यक शास्त्र व सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्य शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदी (M.D. (P.S.M) किंवा DPH ही पदवी” असणे गरजेचे आहे. जी पदवी डॉ. राखी सुहास माने यांच्याकडे नाही. डॉ. माने या ENT म्हणजेच कान, नाक, घसा तज्ञ आहेत. या अर्हता धारकांना केवळ जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णसेवा देणे बंधनकारक आहे. जेणेकरून गरजू रूग्णांना सेवा व ऑपरेशन मोफत करता येईल. दुसरीकडे राज्यभरातील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात ENT तज्ञांनी कमतरता आहे. त्यामुळे डॉ. राखी सुहास माने यांच्यासारख्या तज्ञांनी क्लिनीकल विषयात पदव्युत्तर पदविका मिळवल्याने त्यांच्याकडून गरजू, गरीब रूग्णांना रूग्णसेवा देणे बंधनकारक आहे. उलट असे न होता सेवा भरती नियम, सर्व नियम-अटी व शर्तींना उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांकडून हरताळ फासला जाऊन डॉ. राखी माने यांना प्रशासकीय पदावर बसवले आहे.
हे ही वाचा जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात डॉ. सुहास मानेंकडून रूग्ण आणि नागरिकांची गैरसोय
तसेच या पदासाठी शासन/केंद्र शासन/निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील सहायक आरोग्य अधिकारी वा तत्सम पदावरील, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपाचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा, विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथरोग आजार निर्मुलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींच्या कार्याचा किमान 7 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. सदरचा अनुभवही डॉ. राखी सुहास माने यांना नाही. मात्र सेवा भरती नियमाला कचऱ्याची टोपली दाखवून डॉ. राखी सुहास माने यांची सोलापूर महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी पदावर वर्णी लावण्यात आली आहे.
आर्थिक देवाण-घेवाण की दबाव ?
महाराष्ट्र शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांनी अर्हता, अनुभव नसताना आणि सेवा भरती नियमास हरताळ फासून डॉ. राखी सुहास माने यांची ऑर्डर काढली आहे. तसेच सदरची वस्तुस्थिती समोर आणली असतानाही उप सचिव जेवळीकर हे ऑर्डर रद्द करत नाहीत ? ऑर्डर रद्द न करण्यामागे आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे की कोणाचा दबाव आहे ? याची चर्चा नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सोलापूर महापालिकेत रंगली आहे.
हे ही वाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा काळेंवर कारवाई करत पदव्युत्तर पदविका वेतनवाढी रद्द आणि वसुल करा
आरोग्य मंत्र्यांना CM करण्यासाठी वसुलदारांची वारी आता विदर्भाच्या दारी