प्रतिनिधी : पुणे
गेल्या 3 महिन्यांपासून रिक्त असलेल्या उपसंचालक (आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे) पदी अखेर डॉ. भगवान अंतु पवार यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे या पदासाठी असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विविध आरोप, घोटाळे, तक्रारी आदींच्या अनुषंगाने डॉ. राधाकिशन पवार यांची पुणे उपसंचालक पदावरून कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच 9 जून 2025 रोजी उचलबांगडी केली होती. मात्र या पदावरून हटवूनही डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडेच त्या पदाचा पदभार पुन्हा देण्याचा खटाटोप सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी केला होता. सदरची बाब ‘सत्ताकारण न्युज नेटवर्क’ने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी आरोग्य मंत्र्यांनी ऐन आषाढी वारीत डॉ. राधाकिशन पवार यांची पुन्हा हकालपट्टी करत या पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे दिला. अशातच डॉ. वाडीकर यांची नियुक्ती कोल्हापूरला जिल्हा शल्य चिकीत्सक पदी झाली. परिणामी या पदचा अतिरिक्त पदभार डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे आला. सदरचे पद रिक्त असल्यामुळे या पदासाठी पुन्हा रस्सीखेच सुरू झाली. ज्यामध्ये डॉ. संजीवकुमार जाधव, डॉ. भगवान पवार, डॉ. राम हंकारे, डॉ. संतोष नवले, डॉ. शितलकुमार जाधव आदींची नावे चर्चेत होती. अखेर डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती सदरच्या पदासाठी करण्यात आली आहे. तसा आदेश 22 ऑगस्ट 2025 रोजी उप सचिव दीपक केंद्रे यांनी जारी केला आहे.
अडचणींचा सामना करून अखेर डॉ. भगवान पवार उपसंचालक पदी रूजू
डॉ. भगवान पवार हे यापूर्वी पुणे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पुणे महापालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी पदी कार्यरत होते. 2022 मध्ये उपसंचालक डॉ. संजोग कदम सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदासाठी इतरांबरोबर डॉ. भगवान पवारही शर्यतीत होते. परंतु त्यावेळी त्यांना अडचणीत आणून या पदावर इतर अधिकारी विराजमान झाला. त्यानंतरही या पदासाठी डॉ. भगवान पवार शर्यतीत होते. मात्र त्यांना नाहक पूर्वीच्या निर्दोष झालेल्या तक्रारी पुन्हा काढून त्यांना निलंबीत करण्यात आले. आणि या पदापासून लांब ठेवण्यात पुण्यातील अधिकारी यशस्वी झाले. मात्र या सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर डॉ. भगवान पवार हे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) मुंबई मंडळ, ठाणे येथे कार्यरत राहिले. त्यानंतर आता त्यांना अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर उपसंचालक (आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे) पदी वर्णी लागली असून ते आज, 25 ऑगस्ट 2025 रोजी या पदावर रूजू झाले आहेत.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा