प्रतिनिधी : सोलापूर
एप्रिल २०२५ पासुन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी अनिर्वाय करण्यात आलेली आहे. त्यानुसारच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यात यावा, असे आदेश आयुक्त, आरोग्य विभाग व उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे यांनी दिलेले आहेत. ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रीक हजेरी पत्रक नसताना काढण्यात आल्यास, संबधित जो अधिकारी पगार काढेल, त्याच्यावरती कारवाई करून त्यांच्या पगारतुन सदरची रक्कम वसुल करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश आहेत. असे असताना पंढरपूर येथील जिल्हा हिवताप अधिकारी शुभांगी तुकाराम अधटराव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, आर्थिक देवाण-घेवाण करून हिवताप कार्याल्य पंढरपूर व अक्कलकोट येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार अदा केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार योगेश सुळे यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
लेखी तक्रारीत सुळे यांनी म्हटले आहे की, सध्याच्या जिल्हा हिवताप अधिकारी व हत्तीरोग अधिकारी शुभांगी अधटराव यांनी स्वतःची बायोमेट्रीक नोंदणी केलेली नाहीच. परंतु त्यांच्या मर्जीतील काही निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही बायोमेट्रीक नोंदणी केली नाही. असे असताना या सर्वांचे पगार काढले आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीकची नोंद नाही, किंवा ज्यांचे बायोमेट्रीक हजेरी पत्रक नाही, त्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी 5 हजार रूपये दर महीन्याला घेवुन त्यांच्या पगारी काढण्यात आलेल्या आहेत. हे पैसे गोळा करण्यासाठी काही सोलापुर स्थित कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे.
तसेच हाच प्रकार हत्तीरोग नियंत्रक पथक, अक्कलकोट येथेही सुरु आहे. तेथेही अश्याच प्रकारे बऱ्याच कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रीक हजेरीपत्रक नसतानाही कुंभार नामक कर्मचारी मार्फत पैसे गोळा करून पगारी काढण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरण हे खुप गंभीर असुन आयुक्त व सह संचालक तसेच उपसंचालक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रताप या महोदयांकडुन करण्यात आलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे सरकारी पैशाची लुट करण्यात आलेली आहे. स्वतःकडे असलेल्या पदाचा गैरवापर करण्यात आलेला आहे. तरी आयुक्त यांनी शुभांगी अधटराव यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करुन स्वतःची बायोमेट्रीक हजेरी नसताना शासनाचा पगार घेतलेला आहे. त्यामुळे तो पगार त्यांच्या कडुन वसुल करण्यात याचे. त्यांच्यावरती शासनाची फसवणुक केल्या कारणामुळे ४२० कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावी. त्यांनी शासनाची फसवणुक केल्यामुळे निलंबनाची कारवाई करावी, तात्काळ कारवाई न झाल्यास सह संचालक कार्यालय, पुणे, विश्रांतवाडी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
हे ही वाचा आरोग्य सेवा पुणे उपसंचालक पदी डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती