सोलापूर : प्रतिनिधी
जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथे कार्यरत माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांची जि. प. आरोग्य विभाग, कोल्हापूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसा आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी जारी केला.
डॉ. अनिरूध्द नंदकुमार पिंपळे हे सोलापूर शहर-जिल्ह्यात गेल्या 25 वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत होते. कोरोना काळात त्यांनी लस भांडार सक्षमपणे सांभाळले. माता व बाल संगोपन अधिकारी पदी त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. मात्र असे असताना दुसरीकडे त्यांच्या विरोधात कित्येक वैद्यकीय अधिकारी, सामाजिक संघटना आदींनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त आदींकडे लेखी तक्रारी, लाचलुचपत विभागाकडे अपसंपदा/बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी लेखी तक्रारी गेल्या आहेत. यामुळे नेहमीच ते चर्चेत आणि वादग्रस्तही राहीले आहेत.
दिड वर्षानंतर प्रयत्नांना यश
डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी गेल्या दिड वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागपूरच्या अधिवेशनात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूरचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबीत केले. त्यावेळेस डॉ. बिरप्पा दुधभाते आणि डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी निलंबीत डॉ. शितलकुमार जाधव यांच्या ठिकाणी प्रयत्न केले. परंतु त्याऐवजी येथे डॉ. संतोष नवले यांची वर्णी लागली. त्या दोघांना यश आले नसले तरी त्यानंतर डॉ. दुधभाते यांना मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी संधी मिळाली. यानंतर डॉ. पिंपळे यांनी कोल्हापूरसाठी प्रयत्न सुरू केले. अखेर दिड वर्षानंतर डॉ. पिंपळे यांना यश आले असून त्यांना सध्या कोल्हापूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदी संधी मिळाली आहे.
हे ही वाचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक पदी पुन्हा डॉ. स्वप्निल लाळे
महापालिकेत रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभाग मधील अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या नावे वसुली सुरू
अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार