सोलापूर : प्रतिनिधी
येथील बुधवार पेठ परिसरातील थोरला राजवाडा, मिलिंद नगर, पी. बी. चौक येथील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी. ग्रुप) तर्फे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन (Dhammachakra Pravartan Din) दिनानिमित्ताने भव्य लेझीम ताफा सरावाला सुरवात झाली आहे, अशी माहीती पी. बी. ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा गटनेते आनंद (दादा) चंदनशिवे यांनी दिली.
हे ही वाचा Health camp | पी. बी. ग्रुपच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराचा अडीच हजार जणांनी घेतला लाभ
सुरवातीला प्रबुद्ध भारत चौक येथील प्रबुद्ध भारत विहार विहारातील तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेतली. त्यानंतर भव्य लेझीम ताफा सरावाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या १८ वर्षांपासून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा लेझीम ताफा सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध सराव करत आहे. याला शहर पोलीस दलाच्यावतीने यापूर्वी प्रथम क्रमांक पारितोषिक मिळालेले आहे. या लेझीम ताफ्यामध्ये शहरातील लेझीम खेळाडू हजारो संख्येने टप्प्याटप्प्याने सहभाग घेत असतात. हा सराव प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्यावतीने पी. बी. चौक येथे सलग २० दिवस चालतो.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विजयादशमी (दिनांक २४ ऑक्टोबर २०२३) या दिवशी असल्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील हजारो लेझीम खेळाडू या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवतात. Dhammachakra Pravartan Din
या पी. बी. ग्रुपच्या भव्य लेझीम ताफा सरावा वेळी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, भारत बाबरे, रवीकांत कोळेकर, पी. बी. ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, पी. बी. ग्रुप चे अध्यक्ष अमित बनसोडे, अविनाश भडकुंबे, सुभाष स्वाके, धीरज वाघमोडे, पिंटू वाघमोडे, चंद्रकांत सोनवणे, सुमित चंदनशिवे, नागेश कुंभार, आदित्य गायकवाड, रवि म्यातरोलू, राजू जाधव, विशाल गायकवाड, जयराज सांगे, रोहन तळभंडारे आदी पी. बी. ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते. Dhammachakra Pravartan Din
हे ही वाचा Police Shot Himself | पोलीस अधिका-याने स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य