प्रतिनिधी : सोलापूर
जिल्हा परिषद मधील पाणी व स्वच्छता विभागातील भ्रष्ट कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यावर कारवाई करा, असे भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे सदस्य सुरज हुकूमसिंग राजपूत यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जि. प. च्या पूनम गेटसमोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
सोलापूर जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणारे सचिन जाधव यांच्यावर सुरज हुकूमसिंग राजपूत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसे बॅनर त्यांनी आंदोलनस्थळी लावले आहे. यामध्ये राजपूत यांनी म्हटले आहे की, सचिन जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या भ्रष्टाचाराची खाते निहाय विशेष समिती नेमून चौकशी करावी, जाधव यांच्या विरोधात २०२१ ते आजतागायत आलेले सर्व तक्रारी अर्ज, माहिती अधिकारातील अर्ज यावर शासन स्तरावर झालेल्या निर्णयाचे खुलासे व्हावे, जाधव यांचे सर्व भाडेतत्वावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागात लावलेल्या सर्व चारचाकी वाहने काढून टाकावीत, यासह जाधव यांनी स्वच्छता व जलजीवन मिशन अंतर्गत तालुका निहाय शौचालय बांधकाम व भिंती रंगविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला असून त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राजूपत यांनी केली आहे.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
आशा वर्कर्स् प्रकरण; आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. राखी मानेंच्या उलट चौकशीचे आदेश