सोलापूर : प्रतिनिधी
Health Department : प्रतिनियुक्त्या रद्द करून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच नाहीतर आरोग्य मंत्र्यांनीही दिले आहेत. असे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक यांच्या आदेशाला नाहीतर खुद्द आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला झुगारून येथे रफिक शेख हे अद्यापर्यंत मुख्यालयातच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार ? याकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागात (Health Department) चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा Corruption of Recruitment | नोकर भरतीतील पेपर फोडण्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार
आरोग्य विभागातील अनेकांना प्रतिनियुक्तीच्या खुर्च्या सुटत नाहीत. मुळ नियुक्तीच्या ठिकाणी काम करण्यास अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नकार असतो. परिणामी चुकीच्या पध्दतीने प्रतिनियुक्त्या घेऊन मुख्यालयात कामकाज केले जाते. अशाच पध्दतीने गेल्या दहा वर्षांपूर्वी रफिक शेख यांनी वरिष्ठांकडून प्रतिनियुक्तीची ऑर्डर आणली आहे, असे सांगत आरोग्य विभागाच्या मुख्यालयात मिडीया अधिकारी म्हणून तळ ठोकला आहे. ज्या वरिष्ठांकडून प्रतिनियुक्तीची ऑर्डर आणली आहे, त्यांना मात्र शासन निर्णयानुसार फक्त सहा महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार आहेत. मात्र सध्या दहा वर्षे झाली तरी रफिक शेख हे मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे शेख हे मिडीया अधिकारी म्हणून काम करत असलेल्या कामांची, प्रसिध्दी-छपाई आदीसाठी केलेल्या खर्चाची, खरेदीची सखोल चौकशीची मागणी नागरिकांमधून होत आहे.
हे ही वाचा Service | कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केलेल्या नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा
बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वेळोवेळी दिले आहेत. परिणामी राज्यभरातील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांच्या मुळ ठिकाणी पाठवण्यात आले. परंतु रफिक शेख यांनी या सर्व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. वरिष्ठांनी दिलेले लेखी आदेश त्यांनी गेल्या दहा वर्षापासून नाकारले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर वरिष्ठ काय कायरवाई करणार ? याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. Health Department
हे ही वाचा Mahesh Bhatt On Jawan | महेश भट्ट यांच्याकडून किंग खानचे काैतुक
दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक कर्मचारी शिस्तीस अनुसरून अन्यत्र काम करित असल्याने त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांना मुळ नियुक्तीच्या ठिकाणी काम करण्याबाबत आदेश काढला होता. यावेळी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी औषध भांडार येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत प्रविण नडगिरे यांना त्यांच्या मुळ ठिकाणी उपळाई बु. ता. माढा येथे पाठवल्याचा अहवाल दिला आहे. परंतु नडगिरे हे सध्या औषध भांडार येथेच कार्यरत आहेत. त्यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आदेश मान्य नाहीत का ? की त्यांना वरिष्ठांचे आदेश लागू होत नाहीत ? अशी चर्चा जिल्हा परिषद आरोग्य विभागात रंगली आहे. Health Department
तसेच आरोग्य सहायक सुनिल लिंबोळे यांनी औषध भांडारमध्ये औषध-साहित्य खरेदीचे कामकाज पाहिले आहे. त्यांच्याकडे जीईएम पोर्टल, ई-टेंडर आदी सर्व खरेदी-विक्रीसंदर्भातील लॉगईन आयडी व पासवर्ड आहेत. परंतु तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांना मुख्यालयात आस्थापना असल्याने तेथे कामकाज करण्यासाठी बजावले आहे. असे असताना श्री. लिंबोळे हे देखील औषध भांडार येथे वारंवार दिसून येतात. पूर्वीच्या झालेल्या अर्धवट खरेदी, त्याच्या स्टॉक बुक मधील नोंदी, चलन आदींमध्ये फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील औषध भांडाराचे सीसीटीव्ही फूटेज तपासून नडगिरे आणि लिंबोळे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. Health Department
दहा वर्षे एकाच खुर्चीला चिकटून
चिकटून रफिक शेख यांची मुळ नियुक्ती पंचायत समिती, अक्कलकोट येथे आहे. परंतु ते गेल्या दहा वर्षापासून आरोग्य विभागाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत. ज्या-ज्या वेळेस वरिष्ठांकडून प्रतिनियुक्त्या रद्द केल्या जातात. त्या-त्या वेळेस रफिक शेख यांच्याकडून वरिष्ठांची दिशाभूल करून पुन्हा प्रतिनियुक्ती मिळवली जाते. दरम्यान या कालावधीत डॉ. ए. पी. वाघमारे, डॉ. आर. जे. पराडकर (प्र.), डॉ. एस. एस. भडकुंबे, डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. बी. टी. जमादार, डॉ. शितलकुमार जाधव आणि सध्या डॉ. सोनिया बागडे (प्र.) हे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. जिल्हा आरोग्य अधिकारी बदलून गेले तरी रफिक शेख मात्र येथे एकाच टेबलला चिकटून आहे. त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांकडून काय कारवाई केली जाणार ? याकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. Health Department