सोलापूर : प्रतिनिधी
Death of a Farmer : पूर्व वैमनस्यातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना काल घडली. या हल्ल्यात संबंधीत शेतकरी गंभीर जखमी होऊन सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराला आणण्या पूर्वीच त्याचा मृत्यू (Farmer Murder) झाला असल्याची घटना काल मौजे सराटी, ता. तुळजापूर येथे घडली आहे.
नरसप्पा बाबुराव पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. विहीरीतील पाणी शेताला देण्याच्या कारणावरून, जिवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून डोक्यामध्ये व समोरून तोंडावर जबर वार करण्यात आले आहेत.
हे ही वाचा शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांचे दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन
यामध्ये नरसप्पा बाबुराव पाटील हे पूर्णपणे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, अशी माहिती मिळाली असता त्यांचे भाऊ पंडित बाबुराव पाटील व पुतण्या रमेश पंडित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना अणदूर, ता. तुळजापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यास घेऊन गेले होते. दरम्यान रुग्णालय बंद असल्याकारणाने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले.
दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. गावातील नवनाथ अप्पाराव पाटील यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत पोलीस गुन्हेगाराला ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचे यावेळी नातेवाईकांनी सांगितले.
Death of a Farmer
हे ही वाचा Thieves also celebrated Diwali | चोरट्यांनीही साजरी केली दिवाळी
दिवाळीत अन्न पदार्थांमध्ये भेसळ; स्विट मार्ट, बेकरी व हॉटेलवर कारवाई
(दैनंदिन महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी “सत्ताकारण”च्या अधिकृत WhatsApp Channel ला फॉलो करा.)