सत्ताकारण न्युज नेटवर्क
बहुतांश सर्वांना Chocolate खायला आवडते. परंतु यामधील Dark Chocolate आरोग्यासाठी उत्तम असून त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध दूध आणि इतर अनेक प्रकारच्या चॉकलेट्सपेक्षा डार्क चॉकलेट खाणे कधीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर जाणून घेऊया डार्क चॉकलेटचे फायदे…
डार्क चॉकलेटमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कोकोच्या बियापासून बनवलेले डार्क चॉकलेट हे अँटिऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम असा स्त्रोत आहे, जो आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा धोका ही कमी करण्यास मदत करू शकते. तर जाणून घेऊया डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे…
हे ही वाचा Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
Dark Chocolate मध्ये भरपूर पोषक-अँटीऑक्सिडंट
डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, तांबे यांच्यासह अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. तसेच त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण हे विशेष बनवते. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर सेंद्रिय संयुगे असतात, जी अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. यामध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्हॅनॉल, कॅटेचिन आदींचा समावेश असतो. आहार तज्ञांच्या संशोधनानुसार डार्क चॉकलेटमध्ये असलेले पॉलीफेनॉल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात.
Dark Chocolate खाल्ल्याने रक्तदाब सुधारतो
डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी धमन्यांच्या अस्तरांना (एंडोथेलियम) उत्तेजित करतात. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी आणि रक्तप्रवाहाचा प्रतिकार कमी करण्यासाठी महत्वाचे असे काम करत असतात. परीणामी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना त्याचा फायदा होतो. अभ्यास असे दर्शवतो की, डार्क चॉकलेटमध्ये आढळणारा कोको रक्त प्रवाह सुधारतो, तसेच रक्तदाब रुग्णांना आराम देण्यास मदत करतो.
Dark Chocolate मुळे हृदयावरील दाब कमी होतो
डार्क चॉकलेट हे ब्लड प्रेशर कमी करण्यास उपयुक्त आहे, त्यामुळे त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे खराब कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, फ्लेव्हनॉल-युक्त कोको किंवा चॉकलेटचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळै आठवड्यातून किमान 3 वेळा चॉकलेट खावे.
Dark Chocolate खाल्ल्याने तणाव-चिंताही कमी होते
जर तुम्हाला अनेकदा तणाव किंवा चिंतेचा त्रास होत असेल, तर अशा समस्यांमध्येही डार्क चॉकलेट फायदेशीर ठरू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, चॉकलेटचा गडद एक मध्यम आकाराचा तुकडा (40 ग्रॅम) सलग 2 आठवडे खाल्ल्याने तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची न्यूरोहार्मोनल पातळी देखील कमी होऊ शकते. चिंताग्रस्त असलेल्या लोकांमध्येही डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे दिसून आले आहेत.
हे ही वाचा Maratha Reservation GR | मोदींचा एक फोन येऊ द्या; हे तिघे लगेच जीआर घेऊन येतील