सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूरच्या सिव्हील सर्जन डॉ. वर्षा डोईफोडे यांनी अक्कलकोट आणि करकंब येथील ग्रामीण रूग्णालय आणि इतर उपजिल्हा रूग्णालयांना रात्री 1 वाजता अचानक भेटी दिल्या. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण, मुल्यमापन आणि वस्तुस्थिती पाहून आरोग्य सेवा-सुविधा रूग्णांपर्यंत पोहचण्यासाठी आणि उणिवा दूर करून मार्गदर्शन करण्यासाठी या भेटी देण्यात आल्या. सोलापूरच्या पहिल्या महिला सिव्हील सर्जन ठरलेल्या डॉ. वर्षा डोईफोडे यांनी रात्री 1 वाजता भेटी दिल्याने त्यांच्या धाडसाचे आरोग्य विभागात आणि जिल्ह्यात कौतुक होत आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी रूग्णसेवा प्रथम या तत्त्वानुसार काम करण्यास आणि अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि NHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणीअंती उणिवा दूर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिव्हील सर्जन डॉ. वर्षा डोईफोडे यांनी अनेक उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयांना अचानक रात्रीही भेटी दिल्या. पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक भेटी देऊन तेथील यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार आदींची तपासणी केली जात आहे. यामुळे सक्षम व प्रभावी आरोग्य सेवा नागरीकांना मिळणे सुलभ होणार असल्याचे मत सिव्हील सर्जन डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केले.

आरोग्य संस्थांच्या भेटीसाठी दोन पथके तयार केली आहेत. एक पथक सिव्हील सर्जन डॉ. वर्षा डोईफोडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. आशा घोडके आणि कार्यालयीन अधिक्षक युसुफ शेख यांचे तर दुसरे पथक अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकात क्षीरसाग, निवासी वैद्यकिय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि सहाय्यक अधिक्षक माणिक कदम यांचे आहे. या दोन्ही पथकांकडून उपजिल्हा रुग्णालय अकलूज, उपजिल्हा रूग्णालय पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट, ग्रा. रू. वळसंग, ग्रा. रू. नातेपुते, ग्रा. रू. मद्रुप, ग्रा. रू. माळशिरस, ग्रा. रु. मोहोळ, ग्रा. रु. कुईवाडी, ग्रा. रु. माढा, ग्रा. रु. शेटफळ आणि ग्रा. रु. करकंब येथे अचानक भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान महत्वाच्या कार्यक्रमांचे कार्यपूर्ती मानक (performance Indicatior), माता बाल संगोपन (आरएमएनएच+ए), असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य आजार, सर्वेक्षण कार्यक्रम, आरबीएसके कार्यक्रम, टीबी/कुष्ठरोग कार्यक्रम, HLL सर्व्हिसेस, विशेषज्ञ यांची सुविधा, गृहभेटी, आरोग्य संस्थेचे प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमामधील कामकाज (उद्दिष्ट व साध्य), विविध कार्यक्रमांची आईसी, प्रोटोकॉल्स व इतर जनजागृती साहित्य कक्षात, वॉर्डात व दर्शनीय भागात लावणे, प्रसुती, लसीकरण इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध ऑनलाईन/वेबसाईट/अॅप/पोर्टल यांची पहाणी, (HMIS, RCH, E-Aushadhi, e Sushurt, Nikshay, DHIS, NCD, IDSP, IHIP, AAM, HWC, U-WIN, E-Win, ABDM etc). करण्यात आली.
आरोग्य संस्थांना दिलेल्या भेटीतील निरीक्षणे आणि दिलेल्या सुचना…
औषध भांडार आढावा दरम्यान पुरेसा साठा आढळला.
आहारसेवा, पोषक आहार नियमीत मिळत आहेत.
१०८ आणि १०२ रुग्णवाहीका वाहानचालकासह कार्यरत होते.
सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी भेटीदरम्यान उपस्थित होते.
अनेक ठिकाणी स्वच्छता आढळली नाही, त्या-त्या ठिकाणी स्वच्छतेबाबत सक्त सुचना दिल्या.
हे ही वाचा जिल्हा रूग्णालयात 92 बालरूग्णांच्या मोफत गंभीर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न




