सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सहसंचालक, आरोग्य सेवा, हिवताप हत्तीरोग व जलजन्य आजार, आरोग्य भवन, विश्रांतवाडी, पुणे या कार्यालयांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे, असे आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केले होते. तशी लेखी तक्रारही आरोग्य मंत्र्यांकडे दाखल केली होती. त्याअनुषंगाने या बोगस “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती”त प्रती उमेदवार सुमारे 15 लाख रूपये घेऊन 50 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाला आहे ? याबाबत थेट आरोग्य मंत्र्यांकडे उत्तरासाठी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात “विधानसभा तारांकीत प्रश्न क्र. 19955” यावर प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा बोगस “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती”चा मुद्दा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या निशाण्यावर
विधानसभा तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव डॉ. श्वेता सावदेकर यांनी आयुक्त, आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई आणि संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई/पुणे यांच्याबरोबर नुकताच पत्रव्यवहार केला आहे. (जावक क्र.विसता.2025/प्र.क्र.279/सेवा-2) या पत्रात “प्रती उमेदवार 15 लाख रूपये आणि 50 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार…” याबाबत विचारणा केली आहे. तसेच याच पत्रात “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरती प्रक्रियेत वरिष्ठ लिपिक पुष्पा रामदास विरणक, मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. एकनाथ मालोजी भोसले, सहसंचालक डॉ. बबिता कमलापुरकर व डॉ. राधाकिशन पवार व इतर अधिकारी-कर्मचारी…” यांचा व इतरही गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य विभाग पुन्हा गाजणार आहे, हे मात्र नक्की.
हे ही वाचा पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सक्षम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात




