सोलापूर : रणजित वाघमारे
सोलापूर जिल्ह्यात सध्या उत्तम काम करत असलेले जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यापूर्वी मात्र वादग्रस्त ठरले आहेत. दुसरीकडे सोलापूरमध्ये त्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून पदभार घेताच कामकाज सुरळीत आणि उत्तमपणे सुरू ठेवले असले तरी त्यांच्या कार्यालयातील उपद्रवी अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र उपद्रवी अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा CS डॉ. माने हेच तर पूर्वीचा पाढा गिरवत नाहीत ना ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
यापूर्वी रायगड-अलिबागमध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून डॉ. सुहास माने हे कार्यरत असताना रायगड पोलिस भरती दरम्यान झालेले खंडणी प्रकरण, सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांचा मनमानी कारभार, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाकडे केलेली तक्रार, रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून आपले दालन सुशोभित करून घेणे अशा प्रकारे कामकाज केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात त्यांनी ऑनलाईन बदली प्रक्रीया सोडून अचानक जिल्हा शल्य चिकीत्सक पदी बदली करून आणि तत्काळ पदभार स्विकारून उत्तम प्रकारे कामकाज सुरू ठेवले आहे. परंतु उपद्रवी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आगाऊपणा सुरूच आहे.
डॉ. मानेंची 2 तास चौकशी अण् अटक पूर्व जामिनासाठी अर्ज
मे 2023 मध्ये रायगड पोलीस भरती दरम्यान जिल्हा रुग्णालयातील खंडणी प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक पदी कार्यरत डॉ. सुहास माने यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी डॉ. माने यांची तब्बल 2 तास चौकशी करण्यात आली. या खंडणी प्रकरणात अटक होऊ नये म्हणून त्यांनी अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी त्यांची चौकशी केली होती. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप ढोबळ याला पोलीस कोठडी मिळाली होती. यामध्ये रायगड पोलीस दलातील पात्र 15 महिला उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करूण त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील लिपिक प्रदीप ढोबळ याने पैशाची मागणी केली होती. परिणामी प्रदीप ढोबळ याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. 21 हजार 500 रुपये ही जप्त करण्यात आले होते. यामध्ये डॉ. सुहास माने हे सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. परिणामी त्यांनी आधीच अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
हे ही वाचा Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
दुसरीकडे सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांच्या मनमानी कारभारामुळे डॉ. सुहास माने अडचणीत आणि चर्चेत आले होते. सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलांसह इतर रुग्णांना सोनोग्राफीसाठी ताटकळत ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत होता. डॉ. माने यांनी सुहास ढेकणे यांना समज देत रुग्णांना शांत केले होते. मात्र तरीही सुहास ढेकणे यांचा पवित्रा पूर्वीप्रमाणेच सुरू होता. अशातच जिल्हा रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव, कधी डॉक्टर उपस्थित नसणे, कधी मशिनरी असूनही तंज्ञत्र नसणे, परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल, भ्रष्टाचार, सोनोग्राफी विभागच बंद असे प्रकार वारंवार घडत असल्याने डॉ. सुहास माने हे वादग्रस्त ठरले. परिणामी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमूलकुमार भलगट, अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत आदींनी यासंदर्भात आरोग्य संचालक यांच्याकडे तक्रार दिली होती.
डॉ. सुहास माने या कारणांमुळे राहिले वादग्रस्त
-
जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई असताना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार देणे.
-
जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय बिलांसाठी, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्यासाठी, कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनासाठी, रुग्णालयात विविध सेवा पुरवणाऱ्या ठेकेदार आदींची आर्थिक लाभापाई अडवणूक करणे.
-
जनतेच्या हिताऐवजी रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून आपले दालन सजवून घेणे.
-
भरती प्रक्रीयेतील खंडणी प्रकरण विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजले. त्यानंतर शासनाने अखेर रायगडचे सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने यांची बदली केली. त्यांच्या जागी डॉ. अंबादास देवमाने नवीन जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून रूजू झाले.
-
मात्र यावेळी डॉ. सुहास माने यांना नवीन पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यांना उप संचालक, आरोग्य सेवा, ठाणे यांच्या कार्यालयात हजर रहायचे आदेश शासनाने काढले होते.
रूग्णांवर तातडीने शस्त्रक्रीया करत वाचवले प्राण
जिल्हा रुग्णालयामध्ये सुमित्रा पाटील (वय 50, रा. रावे, ता. पेण) या पोटदुखी व उलट्याच्या त्रासाने गंभीर परिस्थितीत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी बाह्यरुग्ण विभागातील डॉ. परजणे, भूलतज्ञ डॉ. घाटे व अधिपरिचारिका रोशनी यांच्या मदतीने तत्काळ संबंधीतांवर शस्त्रक्रीया करत रूग्णाचा जीव वाचवला. त्यामुळे एकीकडे वादग्रस्त जरी ठरले असले तरी दुसरीकडे त्यांनी तत्पर आरोग्य सेवाही रूग्णांना दिली आहे.
हे ही वाचा पाटील, काकडे, लोमटे यांना बडतर्फ करा
आरोग्य विभागात मुंबई, पुणयासह 11 ठिकाणी उपसंचालकांच्या नव्याने नियुक्त्या