सोलापूर : प्रतिनिधी
येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी व इतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र या भरती प्रक्रीयेत घोळ झाल्याचा आरोप NSUI चे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांनी केला आहे. तरी सदरची भरती प्रक्रीया रद्द करा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाव्दारे त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा महापालिकेत रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभाग मधील अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या नावे वसुली सुरू
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठीची भरती प्रक्रीया आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्या या पदावर रूजू झाल्यापासून महानगरपालिकेचा आरोग्य विभाग चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये डॉ. राखी सुहास माने यांची सदरच्या पदासाठी अर्हता नसताना प्रतिनियुक्ती, परिणामी याविरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन, आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात पोस्टरबाजी, पत्रकारास मारहान प्रकरण, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर गुन्हे दाखल अशा गोष्टी घडल्याने सोलापूर महापालिका आरोग्य विभाग आणि डॉ. राखी सुहास माने या चर्चेचा विषय राहिल्या आहेत. त्यानंतर डॉ. राखी सुहास माने यांनी बायोमेडिकल वेस्ट प्लांटला भेट देऊन त्याची पोलखोल केली. अनेक नागरी आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणा सुरळीत करणे, अशी चांगली कामगिरी करत असताना आता परत आरोग्य विभाग कंत्राटी भरती प्रक्रीयेतील घोटाळ्यामुळे चर्चिला जात आहे. यावेळी मात्र त्यांच्याकडूच कंत्राटी पध्दतीने केल्या जात असलेल्या भरती प्रक्रीयेवर NSUI कडून प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये NSUI चे NSUI जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांनी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, सदरच्या कंत्राटी भरती प्रक्रीयेदरम्यान उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मात्र यावेळेस अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्र-अपात्रतेची कोणतीही यादी प्रसिध्द केली नाही. यावेळी “ठराविक” उमेदवारांना फोनद्वारे मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. आणि जे उमेदवार न बोलविता तिथे हजर होते, त्यांना तुमचे यादीमध्ये नाव नाही, असे म्हणत परत पाठविले. त्यातील काही उमेदवारांनी NSUI चे जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके यांना संपर्क केला. ते मुलाखत स्थळी गेले. यावेळी त्यांच्यावर पोलीस प्रशासनाद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या विरोधात आक्रमक झाल्यानंतर उपायुक्त लोकरे यांनी भेट देऊन इथे उपस्थित सर्व उमेदवारांची मुलाखत होईल, अशी ग्वाही दिली.
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
यावेळी कित्येक उमेदवार हे महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासनाच्या सांगण्यावरून NSUI ची टीम तिथे पोहोचण्यापूर्वीच घरी परतले होते. त्यामुळे त्या परत गेलेल्या उमेदवारांचे पुढे काय ? त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होणार का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला. अशा प्रकारातून सदर भरती ही पारदर्शक झाली का ? असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे याविरोधात संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर भरती प्रक्रिया ही रद्द करा व संबंधितांवर कारवाई करा, अन्यथा या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. या गैरप्रकाराबाबत महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांना त्यांची प्रतिक्रीया व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष चैतन्य घोडके, सामाजिक कार्यकर्ते डी. डी. पांढरे, सामाजिक कार्यकर्ते मिथुन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तामामा पवार, कामगार नेते कबीर तांडुरे, गुंजेगावचे उपसरपंच भडकुंबे, जिलानी मुजावर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुक्त शितल तेली-उगले यांचा प्रशासनावर नाही वचक
महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी रूजू झालेल्या पहिल्या दिवशीच बाळे येथील नागरिक तक्रार घेऊन येताच तेथे प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची सोडवणूक केली होती. उजनी-सोलापूर पाईपालाईनचा प्रश्न गतीने सोडवला. त्यानंतर अनेक कामे त्यांचा प्रशासनावर वचक असल्याने मार्गी लागायची. परंतु सध्याची परिस्थिती पाहता, त्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत घोळ होत आहे. आयुक्त शितल तेली-उगले यांचा पूर्वीप्रमाणे आता प्रशासनावर वचक नाही, असे सदरच्या प्रकरणावरून दिसून येत आहे.
हे ही वाचा रूग्णसेवा टाळण्यासाठी डॉ. सुहास मानेंचा नवा फतवा; ओळखपत्र असेल तरच मिळणार केसपेपर आणि उपचार
297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात