- विकासक मोतिवाला यांच्याकडून शासन आणि नागरिकांची फसवणूक.
- प्लॉट विक्री बाबत ईडीची चौकशी नाकारता येत नाही.
- मोतीवाल्यावर होणार पुन्हा कठोर कारवाई?
रणजित वाघमारे : सत्ताकारण न्युज नेटवर्क
Cheating Government & Citizens : सोलापूर शहराकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहीले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 100 स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरची निवड केली. यामुळे सोलापूरातील रस्ते, ड्रेनेज, घनकचरा आदी बाबतीत जागृती निर्माण झाली. शिवाय बरीचशी रखडलेली प्रकरणे पुर्णत्वाकडे जाऊ लागली. शहरातील नागरिकांचा दर्जा उंचावू लागला. IT पार्क सारखे प्रोजेक्ट डोणगांव रोड येथे येऊ लागले. यामुळे सोलापूर शहराकडे पुणे, मुंबई आदी मोठ-मोठ्या शहरातील नागरिक डोणगांव रोड येथील ओपन प्लॉट घेण्यासाठी पुढे येऊ लागले.
परंतु डोणगांव रोड येथील गट नंबर 15, रॉयल पाम नावाचा ओपन प्लॉट विक्रीचा लेआउट विकासक रफिक मोतीवाला यांनी विक्रीसाठी काढला आहे. सदरच्या लेआऊटचे कुलमुक्त्यार पत्र, जागेच्या खरेदी विक्रीचे अधिकार, लेआऊट च्या विकासाचे सर्वच अधिकार मोतीवाला यांच्याकडे आहेत. असे असताना सोलापूर महानगरपालिकेच्या नियमानुसार रॉयल पाम नावाचा लेआऊट पुर्ण क्षमतेने विकसित न करता येथील प्लॉटची विक्री सुरू आहे. सदर प्लॉटची विक्री नियमानुसार नसून नागरीक आणि प्रशासनाची शुध्द फसवणुक (Cheating Government & Citizens) असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रॉयल पाम या लेआऊट मध्ये एकूण 483 प्लॉट आहेत. यातील प्लॉट नं. 275 ते 483 हे प्लॉट नावापुरते किंबहुना प्लॉट विक्री करिता विकसित केले आहेत. परंतु यातील प्लॉट नं 1 ते प्लॉट नंबर 274 पर्यंतचा लेआउट म्हणजेच अर्धा लेआउट हा 0 टक्के विकसित केला आहे. त्या ठिकानी खुला प्लॉट आहे ? की शेती आहे ? की माळरान आहे ? हे समजून येत नाही. कागदोपत्री लेआऊट वर प्लॉट दिसतो, परंतु प्लॉटच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यास त्या ठिकाणी मोकळी जागा दिसून येईल. या प्लॉटच्या ठिकाणी म्हणजेच मोकळ्या जागेत ड्रेनेज, लाईट, रस्ता आदी काहीच सोयी-सुविधा नाहीत. असे असताना विकासक रफिक मोतीवाला हे याही प्लॉटची विक्री करत आहेत. यामध्ये नागरीक आणि महापालिका प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे दिसून येते.
हे ही वाचा Health Minister | आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”
याबरोबरच विकासक रफिक मोतिवाला हे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात Tax चोरी करत आहेत. यामध्ये रजिस्टर खरेदी करताना 350 ते 400 रूपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे प्लॉट विकल्याच्या नोंदी केल्या जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी 500 ते 1000 रूपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे प्लॉट विकला जात आहे. त्यामुळे रजिस्टर खरेदीखताची रक्कम आणि प्रत्यक्षात नागरिकांना प्लॉट विकल्याची रक्कम यामध्ये तफावत असून उर्वरित रक्कमेवरील टॅक्सची चोरी विकासक रफिक मोतीवाला यांच्याकडून केली जात आहे(Cheating Government & Citizens). त्याला मोतीवालांच्या भाषेत ब्लॅक मनी म्हटले जाते. त्यामुळे हा ब्लॅक मनी मोतीवाला कोणासाठी ? कशासाठी ? कोणत्या कारणासाठी ? वापरत आहेत, याची चौकशी ED, Income Tax आणि Sale Tax विभागाने करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्लॉट खरेदी धारकांकडून केली जात आहे. तसेच या सर्व विभागांनी प्लॉट धारकांचीही चौकशी करून त्यांच्याकडून प्रत्येक प्लॉटला किती रक्कम घेण्यात आली, याची चौकशी करावी, जेणेकरून सत्य बाहेर पडेल.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 10 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2023
तसेच राहता राहिला प्रश्न पूर्ण क्षमतेने विकसित केला नसलेल्या रॉयल पाम च्या लेऑऊट बाबत. त्यची दखल नगर अभियंता आणि महापालिका आयुक्तांनी घ्यावी. आणि सदरच्या विकासकावर कठोर कारवाई करून सदरच्या प्लॉटची खरेदी-विक्री थांबवावी. रफिक मोतीवाला यांच्याकडे असलेले विकासक, बिल्डरचे लायसन व इतर व्यवसायांचे लायसन जप्त आणि रद्द करून ते ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे. प्रशासनाने असे धाडसी पाऊल उचलल्याबरोबर खऱ्या अर्थाने सोलापूर स्मार्ट सिटी होईल आणि इथुन पुढे नागरिक आणि प्रशासनाची फसवणूक करण्यासाठी कोणीही विकासक धजावणार नाही. (Cheating Government & Citizens)
Cheating Government & Citizens : यापूर्वी मोतीवाला यांच्यावर गून्हा दाखल
दहिटणे येथील सर्व्हे नं. 34/4अ/3(टीपी) ही जागा यासीन अमीर हमजा मोतीवाला, रफिक अमीर हमजा मोतीवाला आणि वसीम अमीर हमजा मोतीवाला तसेच सोरेगांव येथील गट नं. 12/1/ब/7 प्लॉट साई इन्फ्राचे संचालक प्रकाश पाटील, आफताब कल्याणी, रोहित देशमुख यांनी विकसित करण्यासाठी महापालिकेत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नगररचना विभागाकडून मोतीवाला आणि साई इन्फ्रा यांना प्राथमिक मंजुरी मिळाली. यानंतर मोतीवाला आणि साई इन्फ्रा च्या संचालकांनी नगररचना कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून बनावट विकसन परवाना पत्र तयार करून घेतले. यानंतर येथील प्लॉटची विक्री सुरू केली. परिणामी यामध्ये सोलापूर महापालिका आणि ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी (Cheating Government & Citizens) वरिल सर्वांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्याकडे होता. त्यामुळे यातील मोतीवाला यांच्यावर यापूर्वी देखील बनावट लेआऊट आणि प्रसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे दिसून येते. त्यामुळे याही प्रकरणात महापालिका प्रशासनाने पुन्हा त्यांच्यावर रॉयल पाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
क्रमशः …
Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा