पुणे : प्रतिनिधी
पुणे मंडळात जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्याची बाब “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने उपसंचालकांच्या निदर्शनास आणुन दिली. परिणामी “बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल”, असा इशारा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी दिला आहे. तसे लेखी पत्र त्यांनी आरोग्य सेवा, पुणे मंडळातील पुणे, सोलापूर आणि सातारा येथील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवले आहे.
पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. उपसंचालक किंवा संचालक यांच्याकडे रितसर प्रस्ताव पाठवून प्रतिनियुक्त्या वरिष्ठांच्या परवानगीने करणे गरजेचे आहे. परंतु वरिष्ठांच्या आदेशाला आणि शासनाच्या नियम-अटींना डावलून जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी स्वतःच्या सहीने, अधिकार नसताना परस्पर प्रतिनियुक्त्या केल्या असल्याची वस्तुस्थिती “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या निदर्शनास आणुन दिली. परिणामी पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी तत्काळ याची दखल घेत “बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याचा गंभीर इशारा” लेखी आदेशाव्दारे दिला आहे. तसे पत्र 18 जुलै 2025 रोजी जारी केले आहे. या लेखी आदेशात म्हटले आहे की, “पुणे, सोलापूर आणि सातारा येथील जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची कामकाजासाठी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. तरी अशा प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात. तसेच यापुढे प्रतिनियुक्त्या करावयाच्या असल्यास, वरिष्ठ कार्यालयाची, तसेच या कार्यालयाच्या परवानगीशिवाय प्रतिनियुक्त्या करण्यात येऊ नये. तसे आढळून आल्यास आपल्या विरूध्द प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.”
डॉ. सुहास माने आणि डॉ. संतोष नवलेंकडून सर्वाधिक बेकायदेशीर आणि परस्पर प्रतिनियुक्त्या…
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून सर्वाधिक बेकायदेशीर आणि परस्पर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. डॉ. सुहास माने यांनी तर कहर करत MVG कंपनीमार्फत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेतील रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीने नेमणुका केल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे वर्ग 1 आणि 2 आस्थापनांचे कामकाज सोपवले आहे. त्यामुळे क्लासवन आणि सुपरक्लासवन अधिकाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. दुसरीकडे डॉ. संतोष नवले यांनीही कहर करत चक्क राज्य शासनाची आस्थापना असलेल्या कनिष्ठ लिपीकास, स्वायत्त संस्था असलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्रतिनियुक्तीवर घेतले होते. मात्र जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी संपुर्ण जिल्ह्यात अनेक प्रतिनियुक्त्या बेकायदेशीरपणे केल्या आहेत. त्या सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करून वरिष्ठांची परवानगी घेतली जाणार का ? असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा डॉ. संतोष नवले आणि मुजावर यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा
अखेर डॉ. राधाकिशन पवार, डॉ. बबिता कमलापुरकर यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी
अखेर कनिष्ठ लिपीक मुजावर यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द