- आमदार संजय गायकवाड यांचा पुढाकार
- पोलीस बळकटीकरण योजने अंतर्गत बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची मंजूरात.
बुलडाणा : प्रतिनिधी
Buldana City Under CCTV Cameras : शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोबत सुरक्षीततेच्या दृष्टीने संवेदनशील तथा अतिसंवेदनशिल व महत्वाचे चौक, मुख्यमार्ग या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वीत करण्यात येणार आहे. बुलढाणा शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दला कडून नियोजन होते. त्या नुसार सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालक मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मा. ना. श्री. दिलीप वळसे-पाटील पालक मंत्री बुलढाणा जिल्हा तथा मंत्री सहकार विभाग, मा. आ. श्री. संजय गायकवाड बुलढाणा वि.स., मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी पोलीस बळकटीकरण योजने अंतर्गत बुलढाणा शहरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती बुलढाणा यांना पाठविला होता.
हे ही वाचा शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करणार – आमदार धीरज लींगाडे
शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2022 नुसार दिलेल्या सुचनांप्रमाणे सर्व नियमांचे पालन करुन, सदर प्रस्तावास मा. आ. श्री. गायकवाड यांच्या सहकार्याने मंजूरी मिळाली आहे. आज दि.05.11.2023 रोजी जयस्तंभ चौक, बुलढाणा येथे मा. श्री. संजय गायकवाड, बुलढाणा वि. स. यांचे हस्ते पोलीस बळकटीकरण योजने अंतर्गत सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन कार्यक्रमाला मा. श्री. सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्री. बी.बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्री. गुलाबराव वाघ उपविपोअ, बुलढाणा, श्री. जयवंत सातव पोउपअधि. (मुख्या) बुलढाणा, पोनि. श्री. अशोक एन. लाडे प्रभारी अधिकारी स्था. गु.शा. बुलढाणा, पोनि. नरेंद्र ठाकरे जिल्हा विशेष शाखा, पोनि. श्री. प्रल्हाद काटकर पो.स्टे. बुलढाणा शहर, पोनि. आनंद महाजन जिवाशाखा बुलढाणा,श्रीमती सुषमा जाधव प्रबंधक पो.अ.कार्या, बुलढाणा यांची प्रमुख उपस्थिती होती. Buldana City Under CCTV Cameras
हे ही वाचा पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दारुड्या पतीस 5 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा
सदर योजने अंतर्गत बुलढाणा शहरामध्ये एकूण 99 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
▪️ येथे लागणार कॅमेरे
शहरातील इक्बाल चौक, टिपू सुलतानचौक, आठवडी बाजार, जयस्वाल चौक, कोर्ट चौक, कारंजा चौक, गर्द चौक, तहसील चौक, एसबीआय चौक, संगम चौक, राजमाता चौक, त्रिशरण चौक, सोसायटी पेट्रोलपंप चौक, केशवननगर चौक, धाडनाका चौक, टिबी हॉस्पिटल चौक, वाय पॉइंट चौक, बर्डे गल्ली, गजानन महाराज चौक, चावडी चौक, एडेड चौक, भोंडे सरकार चौक, आदी 26 महत्वाचे ठिकाणी बसविण्यात येणार आहे. सदरची संपुर्ण प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे हे जेम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत. सदर यंत्रणा मे. अस्पेन सिस्टिम्स अँण्ड सॉफ्टवेअर, पुणे यांना पुढील 05 वर्षे देखभाल दुरुस्तीसह कार्यान्वित करण्यासाठीचे काम दिलेले आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरायंत्रणेव्दारे शहरातील सर्व घटनांवर 24 तास नजर ठेवणेकरीता पोलीस कंट्रोल रुम उभारण्यात येणार असून, सदर यंत्रणा पुर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर त्याची जबाबदारी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकड सोपवविण्यात येणार आहे. Buldana City Under CCTV Cameras
हे ही वाचा केंद्राकडून राज्यातील 15 शहरात PM E Bus Seva, जाणून घ्या कोण-कोणत्या शहरांचा आहे समावेश…