सोलापूर : प्रतिनिधी
ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाणारे फुल म्हणुन ब्रम्हकमळाकडे पाहीले जाते. अतिशय दुर्मिळ असणारे ब्रम्हकमळ जास्त करून हिमालयावर 13 हजार ते 17 हजार फुटांवर पहायला मिळते. परंतु सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे ASI दिलीप भालशंकर यांच्या घरी नुकतेच “ब्रम्हकमळ” उमलल्याचे पहायला मिळाले. उमललेले ब्रम्हकमळ पाहण्यासाठी नातलग आणि नागरिकांनी श्री. भालशंकर यांच्या घरी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
उमललेले ब्रम्हकमळ पाहिल्यास त्यांच्या जीवनात सुख-शांती नांदते. तसेच घरात हे झाड लावल्याने वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही, अशी धारणा आहे. वास्तुशास्त्रानुसार ब्रम्हकमळ घरात उमलल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षाव होतो. या फुलास सूर्यप्रकाशाची गरज नसते.






