सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द केल्यानंतरही “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”चे कामकाज कनिष्ठ लिपीक मुजावर हेच पुन्हा बेकायदेशीरपणे पाहत आहेत. त्यामुळे याला जबाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक मुजावर यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री, संचालक आणि उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा अखेर कनिष्ठ लिपीक मुजावर यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द
लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, जि. प. सोलापूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी उपसंचालकांच्या अधिकाराचा स्वतः गैरवापर करून जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्ती दिली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे उपसंचालकांडे लेखी तक्रार दिली होती. परिणामी कनिष्ठ लिपीक मुजावर यांची बेकायदेशीररित्या केलेली प्रतिनियुक्ती रद्द केली. मात्र सध्या बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द केल्यानंतरही “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”चे कामकाज कनिष्ठ लिपीक मुजावर हेच पाहत आहेत. त्यांना कार्यमुक्त एक महिना झाला, तरी अद्याप कोणाकडेही चार्ज दिला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनीही मुजावर यांना कार्यमुक्त केल्यानंतर चार्ज काढून का घेतला नाही ? त्यांना मुजावरच वसुलदार म्हणून हवा आहे का ? मुजावर कडूनच अद्यापही फाईली का हाताळल्या जात आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मुजावर यांना कार्यमुक्त केल्यानंतरही जि. प. आरोग्य विभागातील फाईली मुजावर यांच्या हाती पडतातच कशा ? या सर्व गोष्टींना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले जबाबदार आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे आणि कनिष्ठ लिपीक मुजावर यांचे निलंबन करावे, अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे केली आहे.
सदरच्या प्रकारावर डॉ. संतोष नवले आणि मुजावर यांची चुप्पी
मुजावर यांच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्तीसाठी एका कंत्राटी वसुलदाराकडून घेतलेले 1 लाख रूपये, कार्यमुक्त करूनही पदभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्यांना पदभार न देणे आणि कार्यमुक्त केल्यानंतरही पुन्हा मुजावर यांच्याकडूनच कामकाम आदींबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. तसेच याबाबत मुजावर यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी इतरांना पदभार दिल्याचे सांगतले. मात्र इतरांना पदभार दिल्याचे पत्र दिले नाही. जर पदभार एक महिन्यापूर्वीच दिला असेल तर तसे पत्र का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मात्र डॉ. संतोष नवले आणि मुजावर यांनी चुप्पी साधली.
हे ही वाचा आरोग्य सेवा पुणे उपसंचालक पदी डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती
भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वच्छता विभागातील सचिन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी