सोलापूर : प्रतिनिधी
BJP Vs Congress : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्री प्रियांका खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांचा अवमान केला, परिणामी भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्यावतीने प्रियांचा खर्गेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि काँग्रेस कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांका खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांचा निषेध सोलापुर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता कन्ना चौकात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा केला.
हे ही वाचा गंभीर-श्रीसंथ वादात आता गोलंदाजाच्या पत्नीची उडी, गंभीरची लाजच काढली
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हिंदूसंघटक सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांका खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजयुमो चे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, शहर उपाध्यक्ष नागेश येळमेली, विजय कुलथे, अजित गादेकर, सरचिटणीस बसवराज गंदगे, रवि कोठमाळे, शहर उत्तर संयोजक शिवराज झुंजे, शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे, प्रविण कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.