सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
“प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती” बोगस व बेकायदेशीरपणे झाली आहे. यावर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी निशाणा साधत त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये बोगस भरतीतील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि सदरची भरती रद्द करावी, अशी लेखी स्वरूपात तक्रारी मागणी केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नमिता मुंदडा यांच्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी “सार्वजनिक आरोग्य विभागा”तील राजरोस चालणाऱ्या भरती घोटाळ्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचे पहावयास मिळत आहे.
हे ही वाचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या बोगस भरती प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे दाखल
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी बोगस प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरतीची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती. तर आता याच बोगस प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरतीचा मुद्दा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही उचलला आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. आमदार धस यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सहसंचालक, आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार, आरोग्य भवन, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे ६. या कार्यालयांतर्गत सन 2022-24 या कालावधीत झालेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरती प्रक्रियेत वरिष्ठ लिपिक पुष्पा रामदास विरणक, मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. एकनाथ मालोजी भोसले, सहसंचालक डॉ. बबिता कमलापुरकर व डॉ. राधाकिशन पवार व इतर अधिकारी-कर्मऱ्यांनी मोठ्या आर्थिक लाभापोटी भरती प्रक्रियेत केलेला गंभीर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार निदर्शनास आणू इच्छितो. तसेच आमदार धस यांनी सदरच्या पदासाठी आवश्यक पदवी, तत्कालीन अप्पर मुख्य सचिव प्रदिप व्यास यांच्या स्वाक्षरीने 29 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित केलेली अधिसुचना, त्यातील मुद्दा क्र. 3 मधील उप मुद्दा 2, बनावटगिरी केल्याने कलम 465, 466, 468,477-ए कलमांतर्गत तत्काळ गुन्हे दाखल ची मागणी, CDR तपासणी, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवणे, शासकीय सेवेतून बडतर्फ करणे, कलम 409 अंतर्गत कागदपत्रांचा गैरव्यवहार, एकत्रित संगणमताने भ्रष्टाचारी मार्गाने पैसे घेऊन भरती करणे, शासकीय दस्तावेजातील कागदपत्रांचा गैरवापर करणे, कागदपत्रे बदलने, बनावट कागदपत्रे तयार करणे, स्वतः उत्तर पत्रिका तयार करणे, उत्तर पत्रिकेतील कोऱ्या जागी उत्तर भरणे, मुळ कागदपत्रांची विल्हेवाट लावणे, असे गंभीर आरोप लेखी पत्रात आमदार सुरेश धस यांनी केले आहेत. या आधारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरती प्रक्रियेत वरिष्ठ लिपिक पुष्पा रामदास विरणक, मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. एकनाथ मालोजी भोसले, सहसंचालक डॉ. बबिता कमलापुरकर व डॉ. राधाकिशन पवार व इतर अधिकारी-कर्मऱ्यांवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई, सेवेतून बडतर्फ आणि भरती रद्दची लेखी मागणी करत खऱ्या उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सक्षम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला 500 कोटींचा निधी मंजुर
11 हजारहून अधिक मुलांवर मोफत ह्दयरोग व इतर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न




