प्रतिनिधी : सोलापूर
सोलापूरात नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुशिलकुमार शिंदेंच्या घरी जाणार आहेत. परंतु 2019 च्या निवडणूकीप्रमाणे यंदाही शिंदेंना भाजप (BJP) प्रवेशाची ऑफर तर दिली जाणार नाही ना ? याची चर्चा सर्वत्र रंगली असली तरी “भाजपच्या चंद्रकांत पाटलांची वारी, काँग्रेसमधील सुशिलकुमार शिंदेंच्या घरी” हे मात्र नक्की असल्याचे खुद्द चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले आहे.
हे ही वाचा पूर्वी वादग्रस्त ठरलेले CS डॉ. सुहास माने अडचणीत येण्याची शक्यता
कुंभारी येथील 15 हजार घरकुलांचा प्रोजक्ट असलेल्या रे नगर च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शुक्रवारी (19 जानेवारी 2024) सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान मोदी हे सोलापुरात येत असल्याने त्यांचा हा दौरा विशेष असा मानला जात आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) हे काँग्रेसमधील जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या सात रस्ता येथील ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सोलापूर शहरात होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ते निमंत्रण देणार आहेत. मात्र या भेटीमुळे सोलापुरातील आणि राज्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा भित्रा नको, सक्षम IAS आयुक्त सोलापूरला हवा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज (बुधवार, 17 जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर असून ते सकाळी साडे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत हेलिकॉप्टरने कुंभारी येथील रे नगर येथे जाणार आहेत. सायंकाळी 5 वाजता काँग्रेस (Congress) मधील जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. सोलापुरात होणाऱ्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण हे मात्र निमित्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असल्याने आणि यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात साहित्य संमेलन, नाट्य संमेलन यशस्वी केल्याने, त्यांचे योगदान पाहता आपण स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?