पुणे : प्रतिनिधी
पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर मधील सिव्हील सर्जनसह 7 जणांना उपसंचालक कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र यामध्ये बिलिंग सेक्शन क्लार्कचे नाव कुठेच नाही. त्यामुळे वित्तीय अनियमिततेत बिलिंग सेक्शन क्लार्कला उपसंचालकांकडून अभय का दिले जात आहे ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात चर्चिला जात आहे.
हे ही वाचा उपसंचालकांकडून सिव्हील सर्जनसह 7 जणांना हजर राहण्याच्या सूचना
पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांचे प्रामाणिक आणि अविरत कष्ट करणारे अधिकारी म्हणून राज्यभरात नाव आहे. बीडचे भूमीपूत्र असलेले डॉ. पवार हे पुणे विभागाचे उपसंचालक असले तरी ते उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, मुंबई आदी इतर शहर-जिल्ह्यात जाऊन आरोग्य शिबिरांचे व इतर कामकाज जातीने लक्ष देऊन पाहतात. इतर विभागाचे उपसंचालक आणि तेथील जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सावंत बंधूचे नाव वापरून डॉ. पवार यांची लूडबुड वाटत असली, तरी डॉ. राधाकिशन पवार यांचे कष्ट सर्वांना मान्य आहे. मात्र उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी पाठवलेल्या पथकाने सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कामकाजाची पाहणी-तपासणी केली असता त्यांनी “अत्यंत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी, मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता आणि शासनाच्या तरतुदीचा भंग केल्याचे आढळून आल्या आहेत.” असा अभिप्राय दिला आहे. त्याअनुषंगाने या विषयक सुनावणीसाठी 26 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या दालनात सिव्हील सर्जनसह 7 जणांना हजार राहण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदिप ढेले, डॉ. धनंजय पाटील आणि सध्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील, अधिपरिचारीका वहिदा शेख, कनिष्ठ लिपीक युसूफखान पठाण, सहाय्यक अधिक्षक मनिषा नागेश बंदपट्टे, सांखिकी अन्वेषक सचिन काकडे आणि औषध निर्माता पी. व्ही. जामगांवकर यांचा समावेश आहे. मात्र बिलिंग सेक्शन क्लार्कचे नाव यामध्ये कुठेच नाही. प्रामाणिक उपसंचालकांनी बिलिंग सेक्शन क्लार्कला सूट का दिली ? याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. बिलिंग सेक्शन क्लार्क कडून येथील बदल्या, प्रतिनियुक्त्यांमधील व इतर कामातील दुवा म्हणून कामकाज पाहत असल्याने सूट दिली असेल, इतर 7 जणांबद्दलची माहिती खुद्द बिलिंग सेक्शन क्लार्कनेच कदाचित उपसंचालकांना दिली असेल, त्यामुळे त्यांचे नाव कदाचित वगळले असेल अशा आदी चर्चा होत असताना दिसून येत आहे.
भुजबळांकडून “विकास” साधण्याचा प्रयत्न
-पुणे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असो की बदल्या, प्रमोशन असो की प्रतिनियुक्त्या या सर्वांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून एका “विकास”काचा उल्लेख पुणे विभागात सर्वत्र होत आहे. आरोग्य सहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची पदोन्नती मध्येही यांची लेखी तक्रार आयुक्त डॉ. धीरज कुमार यांच्याकडे गेली आहे. सध्याच्या अहवालात 3 सिव्हील सर्जन यांचे नाव यांनी अहवालात नमूद केले. मात्र बिलिंग सेक्शन क्लार्कला का सूट दिली. असे अनेक प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात उपस्थित करत एका भुजबळांकडून “विकास” साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सदरची उठाठेव केली जात असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण
आई असो वा आयएएस अधिकारी सर्वांना संघर्ष करावाच लागतो
शिक्षक भरतीमध्ये खासगी संस्थेत मुलाखतीसह एका जागेसाठी दहा उमेदवरांना संधी