– राज्य, जिल्हा स्तरावर चालढकल | सातारामधील पुरवठादार सोलापूरात
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
वरिष्ठ कार्यालयाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) मंजुर पदे भरण्यासाठी जिल्हा स्तरावर सूचना दिल्या होत्या. तरीही जिल्हा स्तरावर मुदत निघून गेल्यानंतरही भरती केली नसल्याने उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी निवड समितीच्या सचिव आणि सदस्यांना जबाबदार धरत पत्र काढले आहे. परंतु दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात DPM हे महत्त्वाचे पद गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून ते पद भरले जात नाहीत. सोलापूर जिल्ह्यास कायमस्वरूपी DPM मिळत नाही, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ भरतीस जिल्हा स्तराबरोबरच राज्य स्तरावरून देखील टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडयानुसार सन 2022-23 मधील मंजुर पदांपैकी रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्याकरीता वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्हा स्तरावर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पदभरती नियोजनाचा कालावधी 8 मे 2023 ते 10 जुलै 2023 पर्यंत होता. वरिष्ठ कार्यालयामार्फत 15 मे 2023 पुर्वीच बिंदुनामावली तपासुन दिलेल्या होत्या. परंतु अद्यापही सोलापूर जिल्हयाची भरती पुर्ण झाली नाही. विशेषतज्ञ व वैद्यकीय अधिकारी (MBBS) ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरावयाची होती. तर इतर एनएचएममधील रिक्त पदे गुणांकन पध्दतीने भरावयाची होती. परंतु तिही पदे भरली नाहीत.
हे ही वाचा Notice | आकुडे यांचे बांधकामात दुर्लक्ष, उपसंचालकांनी दिली नोटीस अन नाकारला खुलासा
सोलापूर जिल्ह्यात 7 जुलै 2023 अखेर पर्यंत वैद्यकीय अधिकारी आणि विशेषतज्ञांची रिक्त पदे 37, अन्य NHM रिक्त पदे 123, बाह्यस्त्रोत रिक्त पदे 70 अशी एकूण 230 रिक्त पदे आहेत. परंतु राज्य आणि जिल्हा प्रशासनाला याचे जराही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. उलट उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी निवड समितीचे सचिव आणि सदस्य यांना 12 जुलै 2023 रोजी पत्रक काढले असून त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, मनुष्यबळ भरती प्रक्रिया करण्यासाठी आपणाला 50 दिवसांचा कालावधी दिलेला होता. परंतु या कालावधीमध्ये आपली भरती प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. ही बाब गंभीर असून यावर पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित होऊ शकतो. तरी विलंबाबाबत खुलासा सादर करावा, दिवसानिहाय नियोजन सादर करुन अहवाल 3 दिवसात सादर करावा. अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. NHM
सातारामधील पुरवठादार सोलापूरात
NHM मधील DPM हे महत्त्वाचे पद आहे. 15वा वित्त आयोग आणि NHM चा मोठ्या प्रमाणात निधी विविध योजना, सेवा-सुविधांसाठी आहे. एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदाचा पदभार असल्यास एकाच वेळेस, एकाच फाईलवर, एकाच व्यक्तीच्या दोन सह्या करून गैरप्रकार वाढू शकतो. त्यामुळे उपसंचालकांनी डॉक्टर अर्हता नसणाऱ्या कंत्राटी महिलेकडे पदभार का दिला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असताना साताऱ्याचे पुरवठादार यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. साताऱ्यामध्ये 15वा वित्त आयोग आणि NHM मधील खरेदीदार किंवा पुरवठादारांकडूनच सोलापूरातही उद्योग सुरू आहेत. अशाच प्रकारे सातारा मधील पुरवठादार पुणे विभागातील इतर जिल्ह्यातही गेले नसतील का ? अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे आणि NHM चे आयुक्त धीरजकुमार यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खुदद आरोग्य विभागात चर्चा आहे. NHM
कंत्राटी महिलेकडे पदभार
सोलापूर जिल्ह्यातील NHM मधील महत्त्वाचे DPM हे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर डॉक्टर अर्हता पात्र उमेदवार असणे गरजेचे आहे. परंतु पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याकडे या पदाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी सदरच्या पदावर डॉ. अमर जाधव, डॉ. राम गुरूवाडी, डॉ. हागरे, डॉ. दळवी यांनी काम पाहिले. तर सदरचे पद रिक्त असताना डॉ. एस. पी. कुलकर्णी, डॉ. विजय शेगर यांनी काम पाहिले. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी आणि कंत्राटी डॉक्टर असताना उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याकडे पदभार देण्याचा कारनामा का केला ? असा प्रश्न खुद्द आरोग्य विभागातूनच उपस्थित केला जात आहे. याकडे NHM आयुक्त धिरजकुमार हे लक्ष देतील का ? की त्यांचाही या प्रकारास पाठिंबा आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. NHM
हे ही वाचा Health Department | आरोग्य मंत्र्यांचा आदेश झुगारून रफिक शेख मुख्यालयातच