प्रतिनिधी : सोलापूर
पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल उदार यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी निर्दोष मुक्तता केली.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
आरोपी राहुल उदार हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. उदार यांच्या सैफूल येथील घरामध्ये पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने बाथरूममध्ये विषारी औषध जबरदस्तीने पाजले. त्यानंतर फिर्यादी पत्नीवर हॉस्पिटलमध्ये आठवडाभर उपचार सुरू होते. यादरम्यान देखील आरोपीने तिथे जाऊन पत्नीला धमकी दिली. परिणामी त्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. राजकुमार बाबरे आणि ॲड. संतोषकुमार बाराचारे यांनी काम पाहिले.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
एनएचएम कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वच्छता विभागातील सचिन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी