Asian Games Arvind Singh | अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांना पदक जिंकणे सोपे नव्हते. अरविंद सिंग च्या पाठीला दुखापत झाल्याने त्याला महिनाभर सराव करता आला नाही. परंतु तरीही त्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले आहे. त्यांनी आपली शर्यत ६:४८.१८ सेकंदांच्या वेळेसह दुसऱ्या स्थानावर पूर्ण केली. चीनच्या संघाने पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक पटकावले.
चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रोइंग संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यांनी दोन रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके जिंकली. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. त्यानंतर, लेख राम आणि बाबू लाल यादव यांनी पुरुषांच्या जोडी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अखेर पुरुषांच्या सांघिक 8 स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. Asian Games Arvind Singh
Asian Games स्पधर्त Arvind Singh ला सुवर्णपदक जिंकायचे होते, परंतु दुखापतीमुळे त्याला सिल्वर पदकावर समाधान मानावे लागले. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पाठीत दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाहिजे तसा सराव करता आला नाही. आता पॅरिसमध्ये होणाऱ्या पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे त्याचे नवे लक्ष्य आहे.
Arvind Singh म्हणाला, “माझ्या पाठीच्या दुखापतीमुळे आम्ही 20 ते 25 दिवस सराव करू शकलो नाही. आता आम्ही पॅरिस ऑलिम्पिकवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. याशिवाय 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही आम्ही सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करू.”हे ही वाचा