सोलापूर : प्रतिनिधी
नवि पेठ येथील श्रेयस हॉस्पिटल प्रकरणात जवळपास 26 हून अधिक आशा वर्कर्स् यांना मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांनी नोटीसा बजावल्या होत्या. याविरोधात लालबावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या महासचिव पुष्पा माने-पाटील यांच्या पुढाकाराने सर्व आशा वर्कर्स् यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांचा मनमानी कारभार व नाहक कारवाईबद्दल आरोग्य मंत्र्यांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली. परिणामी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तत्काळ OSD मार्फत डॉ. राखी सुहास मानेंच्या उलट चौकशी आदेश दिले आहेत.
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”