सोलापूर : प्रतिनिधी
उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर येथील कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर यांच्याकडून मनमानी पध्दतीने मर्जीतील मक्तेदारांना टेंडर दिले गेले आहेत. त्यांच्याकडून शासन निर्णयातील नियम-अटी डावलून चुकीच्या पध्दतीने अनेक टेंडरचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांच्यासह सदरच्या टेंडर प्रक्रीयेशी संबंधीत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मक्तेदारांवर कारवाई करा, अशी तक्रारी मागणी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
शिरापूर उपसा सिंचन योजनेतील अनेक कामांच्या टेंडर प्रक्रीयेमध्ये कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर यांनी शासन निर्णयातील नियम-अटींना डावलले आहे. मर्जीतील मक्तेदारांना टेंडर देण्यासाठी इतर मक्तेदारांना जाणूनबुजून अपात्र करणे, तर दुसरीकडे मर्जीतील मक्तेदार अपात्र असताना त्याला पात्र ठरवून टेंडर देणे, मक्तेदाराचा दाखला चुकीचा असल्याचा अभिप्राय विभागीय कार्यालयाने देऊनही संबंधीत मक्तेदारास टेंडर देणे असे प्रकार सर्रास घडले आहेत. यातील मक्तेदारांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे या कार्यालयातील सर्वच निविदा झालेल्या कागदपत्रांची तपासणी करणे, त्या-त्या प्रकरणाशी संबंधीत कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, संबंधीत कर्मचारी आणि मक्तेदार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, तसा तक्रारी अर्ज जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे, अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, जलसंपदा विभाग, पुणे, कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग, पुणे आणि अधिक्षक अभियंता, भिमा कालवा मंडळ, सोलापूर यांना पाठवला केली आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई केली जाणार ? याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विभागाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ
सदरच्या प्रकरणांबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर यांना प्रतिक्रीया विचारली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
हे ही वाचा औषध महामंडळाकडून जादा दराने औषध खरेदी
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा