सोलापूर : प्रतिनिधी
कायम सेवेतील रिक्त पदांवर चक्क कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंचा अजब कारभार सुरू आहे. तसेच प्रतिनियुक्त्यांचे अधिकार नसतानाही स्वतःच प्रतिनियुक्त्या देऊन उपसंचालकांच्या अधिकारांचा परस्पर गैरवापर त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना बडतर्फ करा, अशी तक्रार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी केली आहे.
हे ही वाचा पूर्वी वादग्रस्त ठरलेले CS डॉ. सुहास माने अडचणीत येण्याची शक्यता
जिल्हा रूग्णालय, सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. येथील जिल्हा रूग्णालयात त्यांनी “ओळखपत्र असल्यानंतरच मिळणार केसपेपर” असा फतवा काढला होता. त्रासाला कंटाळून एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडून सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली होती. आणि आता तर चक्क कायम सेवेतील रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी कहरच केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा रूग्णसेवा टाळण्यासाठी डॉ. सुहास मानेंचा नवा फतवा; ओळखपत्र असेल तरच मिळणार केसपेपर आणि उपचार
या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना शासन निर्णयानुसार वरिष्ठांना देण्यात आलेले अधिकार मान्य नाहीत. त्यामुळे स्वतःहुन त्यांनी त्यांच्या कार्यालयात कायम सेवेतील पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असल्यासारखे त्यांनी कशाही पध्दतीने नेमणुका केला आहेत. परिणामी कायम सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाताखाली कामे करावी लागत असल्याचे वस्तुस्थितीत चित्र आहे. त्यांनी आपल्या जिल्हा शल्य चिकीत्सक पदाची गरीमा राखली नाही. कायम सेवेतील पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि प्रतिनियुक्त्यांचे अधिकार नसतानाही स्वतःच प्रतिनियुक्त्या देऊन उपसंचालकांच्या अधिकारांचा परस्पर गैरवापर केला आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना बडतर्फ करा. तसेच यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आपले मुळ कामकाज पाहुण सदरचे काम पाहावयाचे आहे. परंतु या सर्वांनी आपले मुळ कामकाज पाहिले नाही. फक्त आर्थिक टेबलवरचे कामकाम पाहात आहेत. त्यामुळे MVG कंपनीमार्फत नेमलेल्या या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही काढून टाकावे. तसेच स्वप्निल ढगे आणि काकडे हे देखील नियमबाह्य पध्दतीने कित्येक वर्ष याच कार्यालयात आणि त्याच त्या टेबलला चिकटुन आहेत. त्यांच्या मालमात्तांची चौकशी करावी आणि त्यांनाही त्यांच्या मुळ ठिकाणी पाठवावे.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे आहे कायम सेवेतील रिक्त पदांचे कामकाज…
-
सौरभ कोनमुटे, कनिष्ठ लिपीक-कंत्राटी यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट व माहिती अधिकार…
-
प्रिया लोमटे, कनिष्ठ लिपीक-कंत्राटी यांच्याकडे जिल्हा रूग्णालय व अधिनस्त रूग्णालयातील वर्ग 4 आस्थापना विषयक कामकाज…
-
वर्षा नारायणकर, भांडारपाल-कंत्राटी यांच्याकडे स्टेशनरी भांडार, कंत्राटी सेवा कामकाज व वैद्यकीय प्रतीपुर्ती देयक विभागात लेखी कामकाज मदतनीस…
-
अमर कंजेरी, वैद्यकीय समुपदेस्टा यांच्याकडे जिल्हा रूग्णालय व अधिनस्त रूग्णालयातील वर्ग 1 व 2 आस्थापना विषयक कामकाज…
-
शुभम गुरव यांच्याकडे जिल्हा रूग्णालय व अधिनस्त रूग्णालयातील वर्ग 3 आस्थापना विषयक कामकाज, आयुष कार्यक्रमाचे कामकाज व पीसीपीएनडीटी मदतनीस…
-
चैतन्य शिंदे कंत्राटी यांच्याकडे वैद्यकीय प्रतिपुर्ती विभाग व वैद्यकीय प्रमाणपत्र विभाग…
-
सविता म्हेत्रे, कनिष्ठ लिपीक-कंत्राटी यांच्याकडे जिल्हा रूग्णालय व अधिनस्त रूग्णालयातील वर्ग 1 व 2 आस्थापना विषयक कामकाजात मदत…
-
स्वप्निल ढगे, वरिष्ठ लिपीक यांची सेवाजेष्ठतेनुसार नियम अटी न पाळता त्यांच्याकडे आस्थापना विषयक सर्व कामकाज व लेखा विषयक सर्व कामकाज…
-
एस. डी. काकडे यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती असुन त्यांच्याकडे जिल्हा रूग्णालय व अधिनस्त सर्व कार्यालयाचे नियोजन व बांधकाम विषयक कामकाज, जन्म मृत्यु कामकाज, सांख्यिकी विषयक कामकाज, विधानसभा/विधानपरिषद तारांकीत/अतारांकीत प्रश्नांची उत्तरे देणे बाबत कामकाज…
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये घोळ