सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पुणे सर्कलमध्ये सध्या सक्षम अशा उपसंचालकांची अंत्यत गरज आहे. त्यामुळे पुणे उपसंचालकपदी या पदावर पूर्वी कुशलतेने कार्य केलेल्या डॉ. राधाकिशन पवार यांची नेमणुक करा, अशी मागणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी केली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. भगवान पवारांच्या निलंबनाचे संकेत
लेखी निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी म्हटले आहे की, डॉ. राधाकिशन पवार यांना आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर आरोग्य मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, संचालक यांच्याबरोबर समन्वय साधून दिलेली जबाबदारी अचूक पार पाडतात. त्यांनी यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक, सहसंचालक अशी महत्त्वाची पदे उत्तमरित्या भुषवली आहेत. मात्र सध्या या पदावर कार्यरत उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडून ACB आणि फलटण प्रकरणात सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे. फक्त मिटींग, बैठका, भेटी देण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडून सुरू असला तरी, त्यातून अद्याप पर्यंत काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे पुणे उपसंचालक पदावर कार्यकुशल, तत्पर अशा डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर पुणे उपसंचालक पदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी केली आहे.
हे ही वाचा ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू




