सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात अकलूजमधील एका खाजगी दवाखान्यात सोनोग्राफी सेंटरची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. परिणामी सदरच्या सोनोग्राफी सेंटरच्या परवानगीसाठी सिव्हील सर्जन साहेबांसाठी श्री. एस. डी. काकडे यांनी माझ्याकडे 70 हजार रूपयेची मागणी केली आहे, अशी लेखी तक्रार राम शंकर उंटद यांनी लाचलुचपत विभाग (Anti Corroption), जिल्हाधिकारी आदींकडे 22 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल केली आहे. यामुळे पुन्हा एखदा जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय आणि येथील अधिकारी-कर्मचारी टक्केवारीमुळे चर्चेत आले आहेत.
हे ही वाचा पूर्वी वादग्रस्त ठरलेले CS डॉ. सुहास माने अडचणीत येण्याची शक्यता
तक्रारदार उंटद यांनी लेखी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे की, सिव्हील हॉस्पिटलमधील श्री. एस. डी. काकडे हे सोनोग्राफी चालू करायला परवानगी देत असतात. मी अकलूज तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यात सर्व कामकाजाचे देखरेख करत असतो. त्यामुळे मी आमच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून सोनोग्राफी सेंटरच्या परवानगीसाठी श्री. काकडे यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला 70 हजार रूपयेची मागणी केली. ती रक्कम सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने साहेबांकरीता मागणी केली व ते बोलले की, पैसे दिल्याशिवाय सर्जन हे सही करत नाहीत. हे सर्जन थोटेसुध्दा कमी करत नाहीत. पहिले सर्जन बरे होते. तरी श्री. एस. डी. काकडे आणि सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने यांची चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा. व श्री. एस. डी. काकडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, त्यांच्या उपलब्ध असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी ही ॲन्टी करप्शन (Anti Corroption) विभागामार्फत करून काकडे यांच्याकडे असलेल्या सर्व कामकाजाची चौकशी ही आपल्या विभागामार्फत करून मला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती, असे लेखी तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
हे ही वाचा Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
सदरच्या लेखी तक्रारीमुळे सार्वजनिक आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांनी प्रधान सचिवांकडे विष्णू पाटील, लोमटे, काकडे आणि इसाक शेख यांची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीतही संबंधीत सर्वजन पैसे घेतल्याशिवाय कामे करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच सदरची तक्रार निकाली निघण्याआगोदरच आता श्री. काकडे यांची पुन्हा एक लेखी तक्रार ॲन्टी करप्शन विभागाकडे पुराव्यासहीत गेली आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात या चर्चेला उत आला असून अनेकांनी सदरची गोष्ट खरी असल्याचे सांगितले. अनेकजण येथे पैसे घेतल्याशिवाय कामेच करत नसल्याचे खुद्द येथीलच अधिकारी-कर्मचारी चर्चा करत आहेत.
हे ही वाचा पाटील, काकडे, लोमटे यांना बडतर्फ करा
सध्या श्री. काकडे यांच्याप्रमाणेच इतरही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु त्याकडे वरिष्ठ का लक्ष देत नाहीत ? का कारवाई करत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच यापूर्वी अलिबाग-रायगड येथे पोलिस भरती प्रकरणात डॉ. सुहास माने यांचा पाय खोलात असताना परत सोलापूरातही असाच प्रकार सुरू असल्याने याकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष देण्याची चर्चा शहर-जिल्ह्यात सुरू आहे.
(जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाबरोबरच इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय विभागात एखादी सेवा किंवा इतर कामकाजासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास “लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य” या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. तसेच 1064 हा टोल फ्री नंबर किंवा 9930997700 या व्हाट्सअप क्रमांकावरही संपर्क साधून तक्रार दाखल करता येते.)