प्रतिनिधी : ठाणे
Anna Bhau Sathe आर्थिक महामंडळात घोटाळे केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम तुरुंगातून जामिनावर सुटले आहेत. येत्या काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं.
Anna Bhau Sathe आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. गेल्या 8 वर्षापासून ते ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर आज त्यांची सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. रमेश कदम तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे संपूर्ण तुरुंग परिसर दणाणून गेला होता. यावेळी तुरुंगाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहोता.