भीम आर्मीचा शिंदे-फडणवीसांना इशारा
Breaking News : सोलापूरच्या पहील्याच दौऱ्यात सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर भीम आर्मीचे अध्यक्ष अजय महिंद्रकर यांनी रविवारी शाई फेकली. याप्रकरणी पोलिसांनी महिंद्रकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावर भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेत शिंदे-फडणवीस सरकारला ‘चंद्रकांत पाटलानंतर आता तुमच्यावर शाई फेक करू’ असा इशारा दिला आहे.
हे ही वाचा Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक
पोलिसांनी अजय महिंद्रकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा येत्या काळात खाजगीकरणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाईफेक करू, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
सोलापूरात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी अजय महिंद्रकर यांना बेदम मारहाण केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यापासून महिंद्रकर यांच्या जीवाला धोका आहे, असा आरोपही अशोक कांबळे यांनी यावेळी केला आहे. तसेच कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा चंद्रकांत पाटलानंतर तुमच्यावरही शाईफेक करु, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस यांना दिला आहे.