Suicide : सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पद्मा नगर या परिसरातील एका तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 13 डिसेंबर 2023 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वालचंद कॉलेजच्या मागे पद्मा नगर या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून एका तरूणाने उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे. भागवती प्रसाद अन्नलदास (वय 35, राहणार वज्रेश्वरी नगर, कर्णिक नगर, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसअधिक तपास करित आहेत.