सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
मी कोणाचा एक रूपया घेत नाही, अशी बतावणी करणाऱ्या, मात्र वसुलदारांमार्फत लाखो रूपये वसुल करणाऱ्या पुणे सर्कलमधील एका अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. 5 महिन्यापूर्वी 9 क्षेत्र कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले गेले. मात्र यासाठी यातील 7 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अडीच लाख रूपये दक्षिणा दानपेटीत टाकावा लागला. त्यानंतरच प्रमोशन देण्यात आले. त्यामुळे “क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा” टाकावा लागला, अशी माहिती खुद्द यातील क्षेत्र कर्मचाऱ्यांनी “सत्ताकारण”ला दिली.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
पुणे सर्कलमधील एका वरिष्ठाने 9 क्षेत्र कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यापूर्वी प्रमोशन केले. यामाध्यमातून क्लास फोरचे कारकून केले. परंतु संबंधीतं 9 कर्मचाऱ्यांना प्रमोशनपूर्वी सांगण्यात आले की, प्रेत्यकी अडीच लाख रूपये मोजावे लागतील. परंतु यात आपल्या साहेबांचा एकही रूपया नाही, सर्व मंत्र्यांसाठी करावे लागत आहे. त्यामुळे यातील कर्मचाऱ्यांचाही नाईलाज झाला. परंतु यातील दोन बिचाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे एकही रूपया नाही. आमचं काम करा, किंवा करू नका. परिणामी उर्वरित 7 कर्मचाऱ्यांनी मंत्री महोदयांचे नाव सांगितल्याने नाईलाजास्तव प्रत्येकी अडीच लाख रूपये मोजले. त्यानंतर मात्र या 9 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करण्यात आले. मजेशिर गोष्ट अशी की, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना याची जराही कल्पना नाही. यातील एकाही कर्मचाऱ्याचा एकही रूपया मंत्र्यांपर्यंत पोहचला नाही. कारण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गेल्या 15 वर्षांपासूनचा ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’साठीचे जवळपास 70 कोटी रूपये मॅग्मोच्या पदाधिकाऱ्यांनी वसुल करून गायब केले. त्या 70 कोटी रूपयांचा जराही विचार न करता 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांना खंड क्षमापणाचा मोफत लाभ मिळवून दिला. 15 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न आरोग्य मंत्री पद स्विकारल्यानंतर केवळ वर्षभरात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी निकाली काढला. ते आरोग्य मंत्री 7 कर्मचाऱ्यांचे साडेसतरा लाख रूपये कशाला घेतील. मात्र इकडे आरोग्य मंत्र्यांचे नाव पुढे करून स्वतःसाठी टक्केवारीची वसुली जोरात सुरू आहे. याकडे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्य मंत्र्यांनी त्या 9 क्षेत्र कर्मचाऱ्यांना समोर बोलवावे…
“प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा” टाकणाऱ्या 7 आणि उर्वरित 2 अशा 9 क्षेत्र कर्मचाऱ्यांना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी समोर बोलवावे. अडीच लाखांचा मेसेज क्षेत्र कर्मचाऱ्यांपर्यंत कोणी पोहचवला ? त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख रूपये कोणामार्फत कोणी घेतले ? कधी ? कुठे ? केव्हा ? घेतले गेले. याची माहिती विचारावी आणि वस्तुस्थिती जाणल्यानंतर तरी संबंधीत वसुलदार आणि अधिकारी यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी ईच्छा पिडीत क्षेत्रकर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. अन्यथा एकीकडे आरोग्य मंत्री प्रामाणिकपणे प्रश्न सोडवणार आणि त्यांच्या नावावर, त्यांची बदनामी करून इकडे अधिकारी, अधिकाऱ्यांचे वसुलदार स्वतःची घरे भरणार, हे कीतपत योग्य आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे.
हे ही वाचा ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. भगवान पवारांच्या निलंबनाचे संकेत
ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू




