प्रतिनिधी : सोलापूर
येथील बांधकाम व्यवसायिकास बांधकाम व खाजगी जमीन मोजणी व्यवसायासाठी नवीन GST नंबर काढून हवा होता. यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी 5 हजार रूपयांची लाच स्विकारली. परिणामी सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
घडलेली घटना अशी की, सोलापूरातील एका बांधकाम व्यावसायिकास बांधकाम व खाजगी जमीन मोजणी व्यवसायासाठी नवीन GST नंबर काढून हवा होता. यासाठी त्या व्यावसायिकाने वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी आणि राज्य कर निरीक्षक आमसिद्ध इराण्णा बगले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधीत दोन्ही अधिकाऱ्यांनी 21 ऑगष्ट 2025 रोजी वस्तू व सेवा कर कार्यालय सोलापूर येथे 5 हजार रूपयांची मागणी केली. लाचलुचपत विभागाने सदरच्या घटनेची पडताळणी केली. त्यावेळीही संबंधीत दोन्ही अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यातील आरोपी लोकसेवक याचे सांगणे वरून आज 21 ऑगस्ट 2025 रोजी तक्रारदार यांच्याकडे राज्य कर निरीक्षक आमसिद्ध इराण्णा बगले यांनी 5 हजार रूपये लाच पंचासमक्ष स्वीकारली. तसेच ती रक्कम राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी यांच्या टेबलवरील फाईल खाली ठेवली असता दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
यातील दोन्ही आरोपीकडून वस्तू व रक्कम ताब्यात घेऊन पुढील तपास लाचलुचपत विभागाकडून सुरू आहे. तसेच आरोपींच्या घरझडतीसाठी तात्काळ पथक रवाना करण्यात आले. सापळा कारवाई दरम्यान यातील तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. संबंधीत दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांविरोधात विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरच्या घटनेत तपास अधिकारी व सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी काम पाहिले. तर सापळा पथकामध्ये पोह अतुल घाडगे, पोह सलीम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव व चालक पो. हे.कॉ. राहूल गायकवाड, चालक सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांचा समावेश होता. या कारवाईसाठी लाप्रवि, पुणे परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि., पुणे चे अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर चे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी काम पाहिले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
हे ही वाचा एनएचएम कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप