सत्ताकारण न्युज नेटवर्क
अहमदनगर : नांदेड येथील अभियंत्यास एक कोटीची लाच (A bribe of one crore) घेताना पकडल्याची घटना ताजी आहे, असे असतानाच अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सहाय्यक अभियंत्यास तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (3 नोव्हेंबर 2023) रोजी सायंकाळी रंगेहात पकडले.
हे ही वाचा माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
किशोर गायकवाड (वय 32 वर्ष, रा. नागपूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी नागापूर MIDC पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आला. अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत ठेकेदाराने 100 MM व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे बिल 2 कोटी 99 लाख रुपये झाले होते. सदरच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केली होती. ज्यामध्ये मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घ्यावयाची होती. यासाठी किशोर गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल 1 कोटींच्या लाचेची मागणी केली. दरम्यान ठेकेदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. ही रक्कम शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नगर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे सदरची रक्कम स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार किशोर गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला. त्यावेळी त्याला सदरची लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. या प्रकरणी नागापूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली.
हे ही वाचा Crime News | 11 वर्षाच्या मुलीवर डॉक्टरकडून रुग्णालयातच अत्याचार
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण मागे, सरकारला पुन्हा दिला अल्टिमेट