भाग 2 : रणजित वाघमारे
आरोग्य मंत्र्यांकडून राज्यभरात ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी, जिल्हा व सामान्य रूग्णालयांची पायाभरणी व उद्घाटने, राज्यभरात मोफत आरोग्य शिबिरे, स्वतंत्र औषध महामंडळाची स्थापना अशा कित्येक चांगल्या आरोग्य सेवा आणि योजना राबवण्यात येत आहेत. मात्र त्याच वेळेस सार्वजनिक आरोग्य विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांनी मिळून आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाला जणू बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून “आरोग्य मंत्र्यांच्या CM पदासाठी स्वयंघोषीत वसुलदारांकडून 2 कोटींचा “Sweet Message” आरोग्य मंत्र्यांच्या परस्पर व्हायरल केला गेला आहे. ज्याची चर्चा सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच राज्यभरात सुरू आहे. ज्यामध्ये बीडच्या भुमी पुत्राचा पुढाकार असून त्यांना पुणे, सातारा आणि सोलापूरमधील वसुलदार टोळींची साथ आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
घडलेला प्रकार असा की, आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे. येत्या निवडणुकीत त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे पुणे सर्कलमधील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये, सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 1 लाख रूपये पाठवा, असा “Sweet Message” बीडचे भुमी पुत्र आणि त्यांच्या वसुलदारांकडून पुणे सर्कलमधील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व जिल्हा शल्य चिकीत्सकांमार्फत सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. यामध्ये संबंधीत सर्वांनी तत्काळ “Sweet Message”ची पूर्तता करण्याचे आवाहन WhatsApp Call आणि WhatsApp Msg वरून करण्यात आले आहे. ज्यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर मध्ये 3 जिल्हा शल्य चिकीत्सक आणि 3 जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रूपये, 80 ते 100 वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रूपये आणि 80 ते 100 तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रूपये असे एकूण जवळपास 2 कोटी रूपयांचा “Sweet Message” व्हायरल केला आहे. या मेसेजला अनुसरून अनेक डॉक्टरांनी याला काय “अर्थ” आहे म्हणत “Sweet Message”ची पुर्तता केली आहे.
Sweet Message कलेक्शनची जबाबदारी यांच्यावर…
“Sweet Message”ची सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा सोलापूरातील दाडीवाला क्लासमेट याच्यामार्फत पांडूरंगाच्या पावन नगरीतील सुडकेंच्या माहेश्वरावर, पुणे जिल्ह्याची जबाबदारी बीडच्या भुमी पुत्राबरोबरच आरोग्य मंत्र्यांच्या कात्रजच्या कार्यालयातील एक पीए यांच्याकडे आणि साताऱ्याची जबाबदारी तेथील CS कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या जोडीला इतर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयात कार्यरत महिला तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी बीडच्या भुमी पुत्राने सोपवली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकारातील स्वयंघोषीत वसुलदारांवर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार आहेत ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
क्रमशः
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण