सोलापूर : प्रतिनिधी
138 homeless beneficiaries given free space : जिल्हा परिषदेमार्फत सीईओ मनीषा आव्हाळे यांनी ग्रामीण भागातील १३८ भूमीहीन, बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत जागा दिली आहे. गावठाण जागेतील प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभार्थी बेघर नागरिकांकडून सीईओ मनिषा आव्हाळे यांचे आभार मानण्यात आले.
जिल्ह्यात गावठाण जागा उपलब्ध करून दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे : माढा तालुक्यातील घोटी – १५, जामगाव – ०२ रोपळे खुर्द – ०१, मानेगाव – ०१, सोनंद – ०६, खैराव – ११, निमगाव दें. – ०४, उपळाई खु. – ०९, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी – ०२, सिदखेड – १, मंगळवेढा तालुक्यातील ढवळस – ०२, तळसंगी – १६, लवंगी – ०४, डोणज – ०४, नंदूर – ०१, मोहोळ तालुक्यातील आष्टी – २२, सांगोला तालुक्यातील सोनंद – २७, माळशिरस तालुक्यातील निमगाव – ०९ असे एकूण १३८ भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ५०० चौ. फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. तसा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना सीईओ आव्हाळे यांनी दिला आहे.
केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबाना २०२४ पर्यंत घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहिम (138 homeless beneficiaries given free space) हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आदी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुले बांधण्यासाठी प्रत्येकी 1 लाख 20 हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेतील घरकुलास पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचीत राहत होते. ही बाब विचारात घेवून सिईओ आव्हाळे यांनी सदरच्या भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धता करून दिली.
यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर 2023 या दोन महिन्यात २ हजार १२९ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या २ हजार ९० लाभार्थी जागेअभावी वंचीत आहेत. त्यांनाही नजीकच्या कालावधीत जागा उपलब्ध करून गरजू लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करणार असलेचे यावेळी सीईओ आव्हाळे यांनी सांगीतले. याकामी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी यांनी परिश्रम घेतले. (138 homeless beneficiaries given free space)
हे ही वाचा
IAS CEO Manisha Aavhale | नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला पदभार