अभिनेत्री Zareen Khan ला जामीन मंजूर, मात्र देश न सोडण्याचा कोर्टाचा आदेश
Source : Google
२०१८ च्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री Zareen Khan ला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी तिला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
Source : Google
सोमवारी, ११ डिसेंबर रोजी कोलकाता येथील सियालदह न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीवेळी Zareen Khan देखील उपस्थित होती.
Source : Google
न्यायालयाने अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केला, पण परवानगीशिवाय देश सोडू नये असे आदेशही दिले.
Source : Google
काही महिन्यांपूर्वी फसवणूक प्रकरणात झरीन खानविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे बोलले जात होते. काय होते हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Source : Google
२०१८ मध्ये झरीन खान कोलकाता येथे एका दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. त्यासाठी तिने कार्यक्रमाच्या आयोजकांकडून १२ लाख रुपये आगाऊही घेतले होते.
Source : Google
पण झरीन खान कार्यक्रमाला पोहचलीच नाही, शिवाय तिने याबाबत कोणाला पूर्वकल्पनाही दिली नाही.
Source : Google
आयोजक झरीन खानच्या येण्याची वाट पाहत राहिले, मात्र अभिनेत्रीने काहीच प्रतिसाद दिला नाही. या प्रकारामुळे आयोजकांनी झरीन खानवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
Source : Google
काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी अभिनेत्रीवर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. ११ डिसेंबर रोजी कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना झरीन खान मुंबईहून तेथे पोहोचली.
Source : Google
सुमारे तासभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि झरीन खानला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २६ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.