माजी राष्ट्राध्यक्ष यांना बसणार 2100 कोटींचा दंड? काय आहे प्रकरण?

Source : Google

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मालमत्तेवर कर्ज देणाऱ्या बँकांशी खोटे बोलल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  

Source : Google

या आरोपावरून न्यूयॉर्क येथे त्यांच्यावर नागरी फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आलाय. 11आठवड्यांच्या सुनावणीनंतर आता या खटल्याचा निकाल जानेवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. 

Source : Google

न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी हा खटला दाखल केला होता. या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी ट्रम्प दोषी आढळल्यास 

Source : Google

सुमारे 2100 कोटींचा दंड करावा अशी मागणी केलीय. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

Source : Google

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जर या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना किमान 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी केलीय. 

Source : Google

तसेच, ट्रम्प यांना न्यूयॉर्कमध्ये व्यवसाय करण्यावर काही निर्बंध असतील असे सांगण्यात आले आहे. 

Source : Google

न्यायमूर्ती आर्थर अँगोरॉन हे ट्रम्प यांच्याबाबत सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी करत आहेत. 11 जानेवारी रोजी या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल त्यानंतर ते आपला निकाल देऊ शकतात.