Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

Source : Google

ट्रक चालकांनी संप पुकारलाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात पेट्रोल टंचाईची भिती निर्माण झाली आहे. 

Source : Google

त्यामुळे पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकीच्या मोठ्या रांगा दिसत आहेत. त्याशिवाय APMC मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते. त्यावरही ट्रक चालकांच्या संपामुळे मोठा परिणाम होऊ शकतो. 

Source : Google

ट्रक चालकांनी इतक थेट संपाच अस्त्र का उगारलय? केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की, ट्रक चालकांनी थेट संपाचा मार्ग अनुसरलाय. 

Source : Google

‘हिट एंड रन’ प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम केलेत. त्याविरोधात ट्रांसपोर्टर्सनी संप पुकारलाय. नव्या नियमात 10 वर्ष कैद आणि दंडाची तरतूद आहे. 

Source : Google

सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला आहे. मध्य प्रदेशात या संपाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय. भोपाळच्या अनेक पेट्रोल पंपावर लोक हैराण झालेत. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल संपलं आहे. 

Source : Google

भोपाळमध्ये ट्रक ड्रायव्हर्सनी चक्काजाम केलय. टॅक्सी, बस, ट्रॅक्टर रोखले. त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. जामिन मिळून जायचा. 

Source : Google

पण आता कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झालेत. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते.  

Source : Google

लोकांना आपल्या गाड्याच्या टाक्या फुल करायच्या आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली आहे.  

Source : Google

अनेक ठिकाणी जामची स्थिती निर्माण झालीय. पेट्रोल पंप मालकांनी पंप बंद केले आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी काही किलोमीटरपर्यंत रांग गेली आहे.